
जीवनात शिस्त, परिश्रम व ध्येय निश्चितीचे महत्त्व समजून घेत आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवा. परीक्षेत यशस्वी होण्यासाठी श्रम, नियम, संयम यांचा वापर करा. परीक्षेत यश मिळणारच आत्मविश्वास अंगी बाळगा. असे आवाहन पिंपळगाव हरे.च्या सहाय्यक पोलिस निरिक्षक कल्याणी वर्मा यांनी केले. धी.शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी, शेंदुर्णी संचलित श्रीमती पी. डी. बडोला माध्यमिक विद्यालय येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन संजयराव गरुड होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव सागरमल जैन, सहसचिव यु. यु. पाटील, पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस निरिक्षक कल्याणी वर्मा उपस्थित होते. तसेच कार्यक्रमास वरखेडी गावाचे सरपंच पती चंद्रकांत पाटील (सोनवणे), भोकरी सरपंच अफसर काकर, स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष संजय जैन तसेच अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. याप्रसंगी गांधी विचार संस्कार परीक्षेत इयत्ता नववीतील विद्यार्थिनी कु. गौरी शिवचरण परदेशी हिने जिल्ह्यातून तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते तिचा गौरव करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात संजयराव गरुड यांनी विद्यार्थ्यांना आगामी परीक्षेसाठी मार्गदर्शन केले. सूत्रसंचलन ए. एस. चव्हाण यांनी तर आभार एम. एन. कोळी यांनी मानले. पंचपदीचा वापर केला तर यश नक्कीच मिळेल प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पी.एन. पाटील यांनी केले. जीवनात पुढे जायचे असेल तर सकारात्मक विचार, अथक परिश्रम, जिद्द, चिकाटी, अडथळ्यावर मात या पंचपदीचा वापर जर आपण केला तर नक्कीच यशस्वी व्हाल असे सांगितले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



