
जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी कँडल मार्चचे आयोजन केले होते. आत्महत्या प्रतिबंधासाठी गेल्या वीस वर्षांपासून कार्यरत असलेल्या कनेक्टिंग ट्रस्ट व रोटरी क्लब ऑफ पुणे सारसबाग यांच्या पुढाकारातून हा कँडल मार्च
.
कनेक्टिंग ट्रस्टच्या संस्थापिका अर्णवाज दमानिया, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रणिता मडकईकर, समन्वयक गायत्री दामले, विरेन राजपूत, रोटेरियन सुमेधा भोसले, रोटरी क्लब सारसबागचे आशुतोष वैद्य, रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथच्या अध्यक्षा मनिषा बेळगावकर, रोटरी क्लब ऑफ पुणे सहवासच्या रुमा आगवेकर, मिडईस्टचे अध्यक्ष रोशन, रोटरी क्लब ऑफ पुणे ईस्टच्या अध्यक्षा अलका ओसवाल, रोटरी क्लब ऑफ पुणेचे अध्यक्ष जीवराज चोले, रोटरॅक्टचे समन्वयक सुमित गीते आदी उपस्थित होते. श्रेयस बँक्वेट येथे आत्महत्या प्रतिबंध जागृती करणाऱ्या नाट्यछटांचे सादरीकरण झाले. जीवनातील अंधकार दूर करून आरोग्यदायी आयुष्य जगण्याची प्रेरणा देणारा हा कँडल मार्च होता.
अर्णवाज दमानिया म्हणाल्या, वीस वर्षांपूर्वी आत्महत्या प्रतिबंधासाठी काम सुरु केले, तेव्हा हा विषय निषिद्ध मानला जात होता. मात्र, आज आत्महत्येच्या विचारांपासून परावृत्त करण्याच्या या अभियानात तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी होते, हे पाहून आनंद वाटतो. एकांत, शांतता ही मनाला खात असते. त्यामुळे संवाद करणे, एकमेकांना समजून घेणे गरजेचे आहे. नैराश्य, दडपण, मानसिक कोंडी होत असेल, तर मन मोकळे करायला हवे. मनावर ओझे घेऊन जगत राहिलो, तर मनातील वाईट विचार प्रबळ होत जातात आणि आपण टोकाच्या विचारांकडे जातो.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.