
अहिल्यानगर तालुक्यातील पोखर्डी शिवारातील पिंपळगाव उजनी रोडवरील एका मोकळ्या जागेमध्ये कोंबड्याची झुंज लावून त्यावर जुगार खेळणाऱ्या २१ जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून कोंबड्यांसह २४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम राजेश बोध (रा. झेंडीगेट), आशरफ बाहुला खान (रा. आलमगीर), मोहम्मद उस्मान अली शेख (रा. मुंबई), अमजद युसुफ मगदुम (रा. पुणे), सय्यद अझर अक्तर (रा. पंचपिर चावडी), रोहीत श्रीचंद गोहिर (दरेवाडी, अहिल्यानगर), संदिप ओमप्रकाश कुडीया (रा. वसंत टेकडी अहिल्यानगर), राम हिरालाल क्षत्रिय (नाशिक), तौफिक सिकंदर शेख (रा. नेवासा), अजहर खुदाबक्श शेख (रा. मुकुंदनगर), योगेश मनोहर छजलांनी (रा. दरेवाडी), संतोष गणेश गोयल (रा. शाहापुर, अहिल्यानगर), विकी लक्ष्मण सुजगोहर (रा. येरवडा पुणे), जितेंद्र चंद्रकांत म्हात्रे (रा. भिवंडी जि.ठाणे), अमीन सरदार शेख (रा. गजराजनगर, अहिल्यानगर), तुषार संतोष मुलतांनी (रा. मगळवार पेठ पुणे), समीर फिरोज शेख (रा. अकोले नाका संगमनेर), वसीम सलीम शेख (रा. येरवडा पुणे), गोविंद शाम राजुडीया (रा. पुणे), सोहेल कबीर सय्यद (रा. मुकुंदनगर), उत्तम एकनाथ साळवे (रा. देवळाली कॅम्प, नाशिक) यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोखर्डी शिवारात जुगारासाठी कोंबड्यांची झुंज लावण्यात आली होती. पैशांसाठी प्राण्यांची झुंज लावणे दखलपात्र गुन्हा प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध कायद्यानुसार मनोरंजनासाठी किंवा पैशांसाठी प्राण्यांची झुंज लावणे किंवा त्यासाठी जागा उपलब्ध करून देणे हा दखलपात्र गुन्हा आहे. पहिल्यांदा गुन्हा सिद्ध झाल्यास १० ते ५० रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. मात्र, तीन वर्षांच्या आत पुन्हा तोच गुन्हा केल्यास दंड किंवा ३ महिन्यांपर्यंतच्या तुरुंगवासाची किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार खेळल्यास जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गतही कारवाई केली जाते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



