
निष्ठावंत जुन्या शिवसैनिकांना केवळ मान सन्मान हवा आहे. त्यांची विचारपूस केली पाहिजे. आता जे मोठे झाले आहे ते केवळ जुन्या शिवसैनिकांच्या त्यागाच्या बळावर झाले आहेत. शिवसेना उभी राहिली आहे, ती निष्ठावंतांच्या त्यागाच्या बळावर उभी राहिली आहे. त्यामुळे आ
.
जुन्या शिवसैनिकांचा सत्कार सोहळा शिवसेना भवनात आयोजित केला होता. या मेळाव्यात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, महानगरप्रमुख राजु वैद्य तसेच इतर पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
आजारी असतांना किमान भेटायला तरी जा
यावेळी मिरलेकर म्हणाले की, मी राज्यात सर्वत्र निष्ठावंतांना भेटायला जातो. इथे १९८५ मध्ये जिल्हाप्रमुख वसंत बावसकर आजारी आहेत. मला कळाल्यानंतर मी माझ्या बैठका झाल्यानंतर त्यांना भेटायला गेलो. सर्व कुटुंब त्यांचे एकत्र आले तो माणूस खूप रडला. कधीच कोणी विचारपूस केली नाही. तुम्ही पहिल्यादा आला आहात असे सांगितले. त्यामुळे आपण असे का करत आहोत असा सवाल केला.
एकमेकांची विचारपूस का करत नाहीत. यांना तुमच्याकडून काही पाहिजे नाही. त्यामुळे त्यांना किमान विचारले पाहिजे. मात्र तेवढेही होत नसल्याचे दिसून येत आहे असे सांगत त्यांनी शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर टिका केली. मात्र तरीही निष्ठावंत शिवसैनिक आपल्या सोबत असल्याचे उद्धव ठाकरे यांना सांगणार असल्याचे त्यांनी सांगितले .
आत्ताचे पदाधिकारी कार्यालयात येत नाहीत
खैरे म्हणाले की, मी शिवसेना भवन सुरु व्हावे यासाठी प्रयत्न केले. मात्र काही जण इथे येत नाहीत. काहीनी स्वत:ची कार्यालये सुरु केली आहेत. मी मरेपर्यंत हा पक्ष सोडणार नाही. लोकसभा निवडणुकीत निष्ठावंतांनी माझे काम केले. मात्र आता असलेल्या पदाधिकाऱ्यांनी माझे काम केले नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
एकाच घरात पदे नको, आम्हाला फक्त सन्मान द्या
यावेळी १९८५ पासून काम करत असलेल्या शिवसैनिकांचा सत्कार करण्यात आला. जिल्ह्याभरातून आलेल्या जुन्या शिवसैनिकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. पदाधिकारी म्हणाले की तुम्ही जुन्या लोकांना विचारत नाहीत ही आमची खंत आहे. आमच्या वॉर्डात नियुक्ती करतांना किमान आम्हाला विचारात घेतले जात नाही. बैठकांना आम्हाला बोलावले जात नाही. लहान पोरांना व्यासपीठावर आणि आम्हाला खाली बसवता. निष्ठावंतांना विचारले असते तर चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला नसता. आम्ही इतके वर्ष सेवा केली आम्ही पक्ष सोडला नाही. माझ्या व्यतिरिक्त ज्यांना दोनदा महापौर पद दिले ते सोडून गेले, अशी टीकाही पदाधिकाऱ्यांनी केली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.