
Maharashtra Weather News : संपूर्ण देशात (Monsoon Updates) मान्सून सक्रिय झालेला असतानाच आता जुलै महिन्याच्या अखेरच्या काही दिवसांपासून यंदाचा मोसमी पाऊस त्याचं खरं रुप दाखवण्यास सुरुवात करेल असा इशारा केंद्रीय हवामानशास्त्र विभागानं जारी केला आहे. सध्या मध्य भारतापासून ते अगदी उत्तर भारत, पर्वतीय राज्य आणि पूर्वोत्तर राज्यांमध्येसुद्धा पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. तर, दक्षिण भारतातसुद्धा चित्र वेगळं नाही. दरम्यान देशभरात ऑगस्टची सुरुवातसुद्धा पावसानंच होणार असून, इथं महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसाचा लपंडाव सुरू झाल्याचं पाहायला मिळेल. (Latest Rain News)
राज्यात श्रावणसरींना सुरुवात, मात्र कोणत्या भागाला दक्षतेचा इशारा?
श्रावणसरी अर्थात ऊन- पावसाचा खेळ खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये मुंबई शहर, उपनगर, (Konkan) कोकण पट्टा, मध्य आणि उत्तर महाराष्ट्राचा समावेश आहे. जिथं आकाश बहुतांशी ढगाळ असून पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपातील सरींची हजेरी पाहायला मिळत आहेच. सोबतच या भागांमध्ये अधूनमधून डोकावणारी सूर्यकिरणंसुद्धा हजेरी लावून जात आहेत.
राज्यातील विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मात्र मुसळधार पावसाचा इशारा देत हवामान विभागानं या पट्ट्यासाठी सतर्कतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. इथं पुढील 24 तासांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी असेल असा प्राथमिक अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ज्यामध्ये अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह धडकी भरवणारा पाऊस हजेरी लावून जाऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य प्रदेशपासून बंगालच्या उपसागरात ईशान्येपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्या कारणानं राज्यात पावसाचं प्रमाण असमान दिसून येत आहे.
Heavy rainfall at very likely to occur at isolated places in the districts of Konkan – Goa and Ghat areas of Madhya Maharashtra
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया.https://t.co/jw7yrf9chD भेट घ्या.” pic.twitter.com/FyxLEavr4e
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) July 30, 2025
दरम्यान कोकणातील अंतर्गत आणि किनारपट्टी भागांमध्ये पावसाच्या ढगांची दाटी असेल मात्र, वाऱ्याच्या वेगामुळं इथं पावसाचं प्रमाण मात्र बेताचं राहील असाही प्राथमिक अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
इतका पाऊस पडूनही तापमानवाढ?
राज्यात पावसाने काहीशी इसंत घेतल्यामुळे पुढचे काही दिवस कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. ज्यामुळं पावसानं झालेली तापमानातील घट पुन्हा वाढताना दिसेल. राज्यात बुधवारी सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला इथं करण्यात आली, जिथं तापमानाचा आकडा 30.3 अंश सेल्सिअस इतका नोंदवण्यात आला. कमाल तापमान नोंदले गेले. अनेक दिवसांनी विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद बुधवारी झाली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.