
तालुक्यातील १७ गावांचं नियोजन पाहत असलेल्या जेऊर येथील पोस्ट विभागाच्या कार्यालयाला आग लागून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास लागलेली आग रात्री उशीरापर्यत वाजेपर्यंत आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते. त्या
.
करमाळा तालुक्यातील जेऊर येथे पोस्ट विभागाच्या कार्यालयाला महावीर जयंतीनिमित्त सुट्टी असल्याने कार्यालयामध्ये कोणीही नव्हते. कार्यालय बंद असल्याने परिसरातही कोणीही फिरकले नाही. त्यामुळे नेमकी आग कशाने लागली हे स्पष्ट होऊ शकले नाही. मुळातच कार्यालय हे लाकडी खांब व फर्निचर पासून बनलेले जुने बांधकाम असून वरती पत्र्याचे छत आहे. परिसरात वाढलेली झाडी व गवत असल्याने शेजारून आग पेटल्यानंतर कार्यालयापर्यंत पोहोचल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे किंवा कोणी खोडसाळपणाने सदरचे कृत्य केले आहे का याचा शोध सुरू आहे. दुपारच्या वेळी अचानक आगीचे लोट येऊ लागल्यानंतर परिसरात घटनेबाबत माहिती मिळाली. परिसरातील ग्रामस्थांनी संबंधित ठिकाणी जाऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी डॉ. विजय रोकडे यांचा परिसरातच दवाखाना आहे. त्यांनी करमाळा येथे पत्रकारांशी संपर्क साधला. त्यानंतर तहसीलदार शिल्पा ठोकडे व करमाळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन तापसे यांच्या यांनी घटनेचे गांभीर्य पाहता तात्काळ अग्निशामक संबंधित ठिकाणी पाठवले व आगीवर ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. सदरच्या कार्यालयामध्ये १७ गावचे कामे पाहिले जात असल्याने कार्यालयीन दस्तावेज तसेच पोस्ट बँक व इतर महत्त्वपूर्ण कागदपत्रे व साधनसामग्री या आगीच्या माध्यमातून जळाल्याचे दिसून आले, परंतु या कार्यालयाचा सर्व लेखाजोखा हा ऑनलाइन पद्धतीने सर्वरमध्ये असल्याने माहितीचे कोणतेही नुकसान झाले नसल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली.
आग विझवण्यासाठी ग्रामस्थ धावले या घटनेनंतर करमाळ्याचे सब डिव्हिजन अधिकारी राजेश शर्मा, तक्रार निवारण निरीक्षक सचिन इमडे, पोस्टमास्टर राजू सोनवणे यांच्यासह १७ गावातील वीस ते पंचवीस लोकांचा स्टाफ पोहोचला होता. शिवाय गावकऱ्यांनीही आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. रात्री उशिरापर्यंत सदरचे काम सुरू होते. नेमके नुकसान किती झाले हे पंचनामा केल्यानंतर समजू शकेल अशी माहिती पोस्ट कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.