
Pune Jejuri News latest update : पुणे जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांमध्ये गुन्हेगारीच्या घटना प्रचंड वाढल्या असून, पोलीस यंत्रणा या गुन्हेगारी कृत्यांना आवर घालण्यासाठी सर्वतोपरि प्रयत्न करताना आणि अद्ययावत तंत्रज्ञानाची मदत घेताना दिसत आहे. नुकतीच याची प्रचिती पुरंदर तालुक्यातील एका घटनेदरम्यान आली. जिथं भरदिवसा दरोडा घालणाऱ्या चोरांना जेजुरी पोलिसांनी सिनेस्टाईलनं पकडून अटक करत, या चोरीचा पर्दाफाश केला.
पुरंदर तालुक्यातील जेजुरी परिसरात भरदिवसा तीन चोरांनी घरात दरोडा टाकला. याची माहिती मिळताच स्थानिक तरुणांनी तत्काळ त्यांचा पाठलाग सुरु केला आणि पोलिसांनाही याची माहिती दिली. चोरांनी पिस्तूलाचा धाक दाखवत पोबारा करण्याचा प्रयत्नही केला, मात्र पोलिसांनी ड्रोनच्या साहाय्याने ऊसाच्या शेतात लपलेल्या चोरांचा शोध घेतला. लखनसिंग रतपुतसिंग धुधानी, बेहतसिंग शामसिंग कल्याणी आणि रत्नेश राजकुमार पुरी अशा तिघांना पोलिसांनी अटक केली.
दरोड्यापासून अटकेपर्यंतचा थरारक घटनाक्रम…
पुण्याच्या पुरंदर तालुक्यात असणाऱ्या जेजुरी पोलीस स्थानकाच्या हद्दीतील दौंडज गावात भर दिवसा दरोडा पडला. ही घटना दिवसा घडल्यानं दरोडेखोर नागरिकांच्या नजरेत आले. पुणे- पंढरपूर मार्गावरील नीरा रेल्वे फाटकापाशी या चोरांना काही तरुणांनी अडवलं. मात्र बंदुकीचा धाक दाखवून त्यांनी तिथूनही पळ काढला.
पोलिसांपर्यंत या दरोड्याची माहिती पोहोचताच त्यांनी तातडीनं चोरांचा पाठलाग केला आणि आधी एकाला पकडण्यात यश मिळवलं. तर, ऊसाच्या शेतात लपलेल्या दोघांना चक्क ड्रोनचा वापर करत पोलिसांनी तरुणांच्या मदतीनं चोरांना हेरलं आणि त्यांना अटक केली. अतिशय फिल्मी स्टाईलमध्ये झालेल्या या कारवाईचं सध्या जिल्ह्यातून कौतुक होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
FAQ
ही घटना कधी घडली?
शनिवारी (13 सप्टेंबर 2025) दुपारी दौंडज गावात ही घटना घडली, ज्यानंतकर. पोलीस कारवाई 2 तासांत पूर्ण झाली.
चोर कुठून आले होते?
तिघेही चोर बाहेरील जिल्ह्यांतून (सातारा, सोलापूर, पुणे परिसर). ते पूर्वीही गुन्हेगारीत सामील होते.
ड्रोनचा वापर कसा झाला?
ऊसाच्या शेतात लपलेल्या चोरांचा शोध घेण्यासाठी जेजुरी पोलिसांनी ड्रोन उडवले. हे तंत्रज्ञान गुन्हे शोधात प्रभावी ठरले आणि तंत्रज्ञानाचा वापर पोलीस यंत्रणेतही केला जात असल्याचं स्पष्ट झालं.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.