
Sunil Tatkare Demands CBI Inquiry over Ajit Pawar Plane Crash: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान दुर्घटनेची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी केली आहे. तपासातून जे सत्य समोर येईल ते राज्य आणि देशातील जनतेसमोर ठेवावं असंही त्यांनी म्हटलं आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपण सीबीआय चौकशीची मागणी केल्याचं सांगितलं आहे.
ते म्हणाले की, “आज मुख्यमंत्र्यांची मी, सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ आणि पार्थ पवार यांनी भेट घेतली. दादांचा जो अपघाती मृत्यू झाला त्यासंदर्भातील निवेदन देत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला उद्या केंद्रीय गृहमंत्र्यांकडे राज्य सरकारकडून यासंदर्भात पत्रव्यवहार केला जाईल. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सीबीआय चौकशीसंदर्भात केलेल्या मागणीसंदर्भात माझ्याकडून पावलं उचलली जातील असं आश्वस्त केलं आहे”.
“ज्या दिवशी दुर्घटना घडली त्या दिवशीच त्या खात्याचे केंद्रीय मंत्री नायडू, मुरलीधर मोहोळ तिथे होते. त्यामुळे एक स्वायत्त संस्था अशा पद्धतीच्या दुर्देवी विमान अपघाताच्या संदर्भात भारत सरकाराने आधीच नेमली आहे. त्या स्वायत्त यंत्रणेने तपास सुरु केल्याचं त्यांनी आधीच जाहीर केलं आहे. स्वायत्त यंत्रणाही तपास करेलच, पण सीबीआय तपास करत असताना आणखी व्यापकतेने तपास होऊ शकते. ज्यावेळी स्वायत्त यंत्रणा तपास करतात त्यावेळी बाहेरील अपघाती प्रकऱणाचा तपास करणाऱ्यांचीही मदत तिथे होऊ शकत असते. त्यामुळे आमची मागणी आहे की, सखोल तपास व्हावा. जे मुद्दे उपस्थित होतील त्यासह हा तपास केला जावा आणि तो निष्कर्ष राज्यासह देशातील जनतेसमोर ठेवावा. यामुळेच आम्ही आज मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली,” अशी मागणीही सुनील तटकरेंनी केली आहे.
नरहरी झिरवळ प्रकरणात काय सल्ला द्याल असं विचारलं असता ते म्हणाले की, “प्रतिमा निश्चित मलीन होते. त्यामुळे आपल्या कार्यालयात नेमला जाणारा स्टाफ चिकित्सा करुनच नेमला जावा. स्पष्टपणा असावा यासाठी अशा प्रकारची कोणतीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही असं सांगावं. याची खबरदारी सर्वांनी घेतली पाहिजे. अशा घटनांमुळे सरकारच्या प्रतिमेवर परिमाण होत असतो, मंत्र्याच्या अख्त्यारित बाब येते त्यांच्याही प्रतिमेवर परिणाम होत असतो. त्यादृष्टीने आम्ही चर्चा केली असून, इतरही सर्वांना त्यापद्दतीच्या सूचना दिल्या आहेत”.
कोणताही निर्णय मंत्र्यांच्या स्वाक्षरीशिवाय होत नसतो. अशावेळी असे आदेश काढणाऱ्यांची चौकशी व्हावी. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. वहिनींनीही उपमुख्यमंत्री म्हणूनही तशा सूचना दिल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



