digital products downloads

झी 24 तासच्या ऑपरेशन 7/12 ला मोठं यश, कोण आहे शीतल तेजवानी? काय आहे कोरेगाव जमीन घोटाळा प्रकरण?

झी 24 तासच्या ऑपरेशन 7/12 ला मोठं यश, कोण आहे शीतल तेजवानी? काय आहे कोरेगाव जमीन घोटाळा प्रकरण?

Pune Land Case Shital Tejwani Arrest : झी 24 तासने पुणे कोरेगावमधील मोठा जमीन घोटाळा उघड केला होता. अमेडिया कंपनीने जमीन घोटाळा केल्याचा मोठ्या गौप्यस्फोट केला. त्यानंतर झी 24 तासनं हा गैरव्यवहार 5 नोव्हेंबरला बाहेर काढला. शीतल तेजवानीवर 6 नोव्हेंबरला गुन्हा दाखल केला. तब्बल एक महिन्यात अखेर शीतल तेजवानीला अटक करण्यात आली. पुणे पोलिसांच्या या कारवाईमुळे झी 24 तासच्या ऑपरेशन 7/12 ला मोठं यश मिळालं आहे. 

Add Zee News as a Preferred Source

कोण आहे शीतल तेजवानी?

शीतल किशनचंद तेजवानी पिंपरीची रहिवासी आहे. शीतल  तेजवानी हिनं कोरेगाव पार्क जमीन व्यवहारात अतिशय महत्वाची भूमिका बजावली. शीतल तेजवानी आणि त्याचा नवरा सागर सूर्यवंशी यांच्याविरोधातही याआधी फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सेवा विकास सहकारी बँकेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी शीतल तेजवानीच्याविरोधात गुन्हे दाखल आहे. शीतल तेजवानीच्या विरोधात सीआयडी आणि ईडीकरडूनही याआधी कारवाई केली आहे. शीतल तेजवानीला सेवा विकास सहकारी बँकेच्या फसवणूक प्रकरणी अटकही झाली होती. शीतल तेजवानीच्या विरोधात याआधीचे शेतकऱ्यांचे फसवणूक केल्याचे दोन गुन्हे दाखल आहेत. आता बावधन पोलीस ठाण्यामध्ये जमीन फसवणूक केल्याप्रकरणी तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शीतल आणि सागरची कर्ज प्रकरणं 

सागर सूर्यवंशीनं रेणुका लॉन्सच्या नावे 2 वेगवेगळी वाहन कर्ज घेतली
1 कोटी 16 लाख
2 कोटी 24 लाख
————–
शीतल तेजवानीनं 2 कारसाठी  4 कोटी 80 लाख कर्ज घेतलं
——————
सागर सूर्यवंशीनं सागर लॉन्सच्या नावे 16 कोटी 48 लाख कॅश क्रेडिट कर्ज घेतलं
——————–
शीतल तेजवानीवरील आणखी एक कर्ज 10 कोटींवर गेलं
——————-
शीतलच्या पॅरामाऊंट इन्फ्रा कंपनीवर 5 कोटी 95 लाखांचं कर्ज
——————————
रेणुका लॉन्सच्या नावे आणखी 5 कोटी 25 लाखांचं कर्ज

एकूण कर्जाची रक्कम 100 कोटींच्या घरात

कोरेगाव जमीन घोटाळा नेमकं प्रकरण काय?

पुण्यातल्या कोरेगाव पार्क परिसरात जमिनीचा भाव कागदावर आहे 300 कोटी रुपये. ही आहे सरकारी किंमत. खरी किंमत त्यापेक्षा कितीतरी अधिक असल्याचं जाणकार सांगतात. ही जमीन खरेदी करण्यासाठी अमेडिया कंपनी सरसावली होती खरी. पण त्याच्यामागे एक मोठी राजकीय व्यक्ती आहे. ही राजकीय व्यक्ती कोण ते तुम्हाला त्या कंपनीच्या नावावरुन समजणार आहे. यासाठी आम्ही अमेडिया कंपनीचे मालक कोण याचा शोध घेतला. अमेडिया कंपनीच्या मालकांचं नाव ऐकून तुम्ही ताडकन उठून उभे राहाल. या कंपनीचे मालक आहेत पार्थ अजित पवार, दिग्विजय अमरसिंह पाटील. 

या जमिनीत एवढ्या मोठ्या असामींचा इंटरेस्ट का आहे हे तुम्हाला आम्ही पुढं सांगणारच आहोत. पार्थ पवारांच्या या अमेडिया कंपनीनं जमीन खरेदीसाठी एक मार्ग निवडला. 300 कोटींची जमीन खरेदी करायची तर त्यासाठी कोट्यवधी रुपयांची स्टँप ड्युटी भरावी लागली असती. स्टँप ड्युटी माफ व्हावी यासाठी आयटी धोरणाचा लाभ घेण्याचं कंपनीनं ठरवलं.

राज्य सरकारच्या धोरणाअंतर्गत माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा उपक्रमामध्ये एकूण स्थिर भांडवली गुंतवणुकीच्या कमीत कमी 25% एवढी अतिरिक्त स्थिर भांडवली गुंतवणूक केल्यास सदर गुंतवणुकीला विस्तार किंवा विविध करण प्रकल्प मानले जाईल व सदर घटक हा मुद्रांक शुल्क माफीस पात्र राहील. तसेच ज्या माहिती तंत्रज्ञान उद्यानांना संबंधित नियोजन प्राधिकरणाकडून वैध प्रारंभ प्रमाणपत्र किंवा रे राम मंजुरी मिळाली असल्यास अशा माहिती तंत्रज्ञान उद्यानामध्ये स्थापित होणारे माहिती तंत्रज्ञान घटक हे मुद्रांक शुल्क सूट मिळण्यास पात्र असतील. असं हे धोरण आहे.

दरम्यानच्या काळात 22 एप्रिल 2025 रोजी अमेडिया कंपनीनं आयटी पार्क उभारणार असल्याचा ठराव केला. या ठरावावर पार्थ अजित पवार आणि दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्या सह्या स्पष्टपणे पाहाता येतात. अवघ्या 2 दिवसांत म्हणजे 24 एप्रिलला अमेडिया कंपनीची ही फाईलवर राज्याच्या उद्योग संचलनालयानं स्टँप ड्युटी माफी मंजुरीची मोहोर उमटवली. पुढच्या अवघ्या 27 दिवसांत जमी खरेदीचा व्यवहार उरकण्यात आला. यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अमेडिया कंपनी 22 एप्रिल 2025ला आयटी पार्क उभारणीचा ठराव करते. त्यानंतर अवघ्या 48 तासांत म्हणजे 24 एप्रिल 2025 रोजी कंपनीला उद्योग संचलनालय परवानगी देते. 48 तासांत कंपनी ठराव करते काय आणि उद्योग संचालनालय त्यावर अभ्यास करुन तो मंजूरही करते हे सगळं डोकं चक्रावून टाकणारं आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp