
केंद्र सरकारने हॉटेल, ढाबे, रेस्टॉरंट आणि दुग्धशाळांसाठी व्यावसायिक सिलिंडरचा कोटा 20 टक्क्यांनी वाढवून 50 टक्क्यांपर्यंत नेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. मात्र, या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी नाही. प्रत्यक्षात बुकिंग कधीपासून सुरू करायचे? त्याची मर्यादा किती दिवसांची असावी? याबाबतच्या मार्गदर्शक सूचना राज्याकडून आलेल्या नाहीत. त्यामुळे कंपन्यांकडून व्यावसायिक सिलिंडरचा कोटा एजन्सीसाठी अद्याप रिलीज करण्यात आलेला नाही. शासनाच्या मार्गदर्शक सूचना नसल्याने व्यावसायिक वर्गात संभ्रमाचे वातावरण आहे. सोमवारी, व्यावसायिक सिलिंडर वितरणासंबंधी पुरवठा विभागाची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली. यात सोलापुरातून जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे आणि शहर अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे सहभागी झाले होते. भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या कंपन्यांकडे सिलिंडरचा साठा असूनही वितरण प्रक्रिया ठप्प असल्याचे सांगण्यात आले. सोमवारी शहरातील सर्वच एजन्सींच्या बाहेर आणि त्यांच्या गोदामांत ग्राहकांच्या रांगा होत्या. तिथे सूचना फलक लावण्यात आले होते. काही ठिकाणी ग्राहक आणि एजन्सीधारक यांच्यात वादही पाहायला मिळाले. एजन्सींच्या बाहेर ग्राहकांच्या रांगा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घरगुती गॅस ग्राहकांना दिलासा देण्यासाठी 23 मार्चपासून बुकिंगनंतर 96 तासांच्या आत सिलिंडर घरपोच करण्याचे लेखी आदेश सर्व गॅस एजन्सींना दिले आहेत. त्याचा अंमल सोमवारपासून सुरू झाला. परंतु ग्राहकांनी सिलिंडर मिळवण्यासाठी सकाळपासूनच गॅस एजन्सींच्या बाहेर रांगा लावल्या. त्यांना पुढील 4 दिवसांत पुरवठा सुरळित होईल, असे सांगण्यात आले. उद्योगांना सिलिंडर देण्यात संभ्रम रेस्टॉरंट, ढाबे, हॉटेल्स, अन्नप्रक्रिया, दुग्धव्यवसाय, सामुदायिक स्वयंपाकघरे, स्थलांतरित मजुरांसाठी 5 किलो एफटीएल यांसारख्या क्षेत्रांना शासन निर्णयाने दिलासा मिळाला असला तरी, लघु आणि मोठ्या उद्योगांना व्यावसायिक सिलिंडर पुरवण्याबाबत अद्याप कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाहीत. यामुळे अनेक उद्योजकांचे काम गॅसअभावी रखडले आहे. शासनाच्या सूचनेनंतरच वितरण व्यावसायिक सिलिंडर वितरणाबाबत केंद्र सरकारने कोटा वाढवला आहे. परंतु राज्य सरकारकडून त्यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना अद्यापही मिळालेल्या नाहीत. त्या मिळाल्या की प्रत्यक्षात व्यावसायिक गॅसची बुकिंग सुरू करण्यात येईल. त्यानंतर वितरण होईल. ओंकार पडोळे, शहर अन्नधान्य वितरण अधिकारी, सोलापूर
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



