
.
धरणे पायथ्याशी असताना महिलांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाणी योजना असूनही नसल्यासारख्या आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे. यामुळे सरकारचे डोळे उघडण्यासाठी व निषेध करण्यासाठी एल्गार कष्टकरी संघटनेच्या शेकडो महिला व आंदोलक मंत्रालयावर दि. १४ एप्रिल रोजी इगतपुरी सकाळी रेल्वेस्थानकावर पोहोचले. पाणीपुरवठा अधिकारी, तहसीलदार, पोलिस आणि जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र घेऊन चर्चा करण्यासाठी प्रतिनिधी आले. सर्व मागण्याच्या अनुषंगाने सर्व खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक इगतपुरीचे उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात दि. १५ रोजी बैठक घेण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले. त्यानुसार आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले.
या बैठकीत समाधान न झाल्यास मंत्रालयावर कोणालाही न सांगता धडक मारून आंदोलन करू, असा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मधे यांनी यावेळी दिला आहे.
जलजीवन मिशनच्या सर्व कामांची चौकशी करावी, योजनेतून वगळलेले आदिवासी पाडे योजनेत समाविष्ट करावे, त्र्यंबकेश्वर व इगतपुरीसह जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांतील जलजीवन मिशन योजनेच्या अपूर्ण कामांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, पाणीटंचाईच्या ठिकाणी तत्काळ टँकर सुरू करावेत, दरम्यान, १५ एप्रिलच्या बैठकीत पाणीटंचाई, जलजीवनचा भ्रष्टाचार, ठेकेदारांना काळया यादीत टाकून कारवाई आदीबाबत विचार केला जाणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.