
.

तालुक्यातील टरबूज उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. यंदा टरबूज आणि खरबूज या दोन्ही पिकांवर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे टरबूज व खरबुजांच्या वेली सुकायला लागल्या आहेत. शेतकऱ्यांनी लागवडीसाठी हेक्टरी एक लाख रुपयांचा खर्च केला. परंतु वेली सुकल्या व फळे पिवळी पडल्याने अकोट तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या हातात एक रुपयाही पडला नाही.
उन्हाळ्यात टरबूज व खरबूजाला चांगला बाजारभाव मिळण्याच्या आशेवर अकोट तालुक्यातील पिंप्री जैनपूर, उमरा, सावरा,पणज, अकोली जहागीर, मुंडगाव, अकोलखेड आणि बोर्डी गावासह अनेक भागात टरबूज व खरबुजाची लागवड करण्यात आली आहे. मात्र, ऐन हंगामात जमिनीत बुरशीच्या प्रमाणात वाढ झाल्याने वेली सुकण्यास सुरुवात झाली आहे. पिकांची लागवड करण्यात आली, मात्र ऐन हंगामात जमिनीत बुरशीच्या प्रमाणात वाढ झाल्याने वेली सुकण्यास सुरवात झाली आहे. हातातोंडांशी आलेला घास यावेळी हिरावून घेतला, त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना खरबुजांच्या लागवडीसाठी हेक्टरी सरासरी एक लाख रुपयांचा खर्च आला आहे. ^अद्यापपर्यंत तक्रार आली नाही. तरीही संबंधित गावचे सहाय्यक कृषी अधिकारी यांच्यापर्यंत पाहणी करुन प्रादुर्भावाचा अंदाज घेण्यात येईल. त्यानुसार मार्गदर्शन करण्यात येईल. – नीलेश सुरळकर, प्रभारी कृषी अधिकारी.
रोगाची लक्षणे रोगामुळे टरबुजाची वाढ थांबली, अनेक ठिकाणी वेली जळल्या, काही शेतकऱ्यांच्या शेतात वेली वाढवण्याअगोदरच जळाल्या. हिरवे दिसणारे टरबूज लवकरच पिवळे पडले, फळातील गोडवा नाहीसा झाला.
१२ एकरांवर लागवड, रुपयाही हातात नाही ^१२ एकरांवर टरबूज पिकाची लागवड केली होती. लागवडीसाठी हेक्टरी एक लाख रुपयांचा खर्च आला. अनेक औषधी फवारणीसह उपाययोजना केल्या, मात्र एकाही रुपयाचे उत्पन्न हातात आले नाही. – राजेश जवंजाळ, शेतकरी, पिंप्री जैनपूर.
३० दिवसानंतर वेल सुकायला लागली ^खुदावंतपूर शिवारात शेती आहे. दरवर्षी कलिंगडाची लागवड करतो. सुरवातीला वेलीची वाढ व्यवस्थित होती. मात्र, नंतर ३० दिवसांमध्ये वेल सुकायला सुरवात झाली. फवारणी करुनही कोणताच फायदा झाला नाही. कंपनीकडे विचारणार केली असता जमिनीत बुरशीची वाढ झाल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे सांगतात. – अनंत मिसाळ, शेतकरी, अकोट.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



