
आयसीसीने आगामी टी-20 वर्ल्डकप 2026 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र, या वेळापत्रकातील अंतिम सामन्याच्या ठिकाणावरून आता नवा राजकीय वाद उफाळून आला आहे. वर्ल्डकपची फायनल पुन्हा एकदा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार असल्याचे स्पष्ट होताच, शिव
.
आयसीसीच्या आगामी टी-20 विश्वचषकाच्या वेळापत्रकाची मुंबईत घोषणा करण्यात आली. 7 फेब्रुवारी ते 8 मार्च या कालावधीत भारत आणि श्रीलंकेत या विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 8 मार्चला अहमदाबादमध्ये खेळवण्यात येणार आहे. अंतित सामना अहमदाबादला ठेवण्यात आल्यामुळे आदित्य ठाकरे यांनी आयसीसीला काही प्रश्न विचारले आहेत.
नेमके काय म्हणाले आदित्य ठाकरे?
टी-20 वर्ल्डकपचे वेळापत्रक समोर आल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “टी-20 वर्ल्डकपचे वेळापत्रक आले आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे फायनल पुन्हा अहमदाबादलाच ठेवण्यात आली आहे. प्रत्येक अंतिम सामना तिथेच नेण्याचे हे काय नवीन फॅड आहे? अहमदाबाद हे काय क्रिकेटचे पारंपरिक केंद्र आहे का? मग मुंबईला का डावलले?”
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी 20११ च्या विश्वचषकाची आठवण करून दिली. “टी-20 वर्ल्डकपच्या फायनलसाठी वानखेडे स्टेडियम हे सर्वोत्तम ठिकाण ठरले असते. 20११ ची ती ऐतिहासिक फायनल कोणी विसरू शकेल का? असे असतानाही पुन्हा अहमदाबादलाच पसंती देणे चुकीचे आहे,” असे मत त्यांनी मांडले.
कोलकाता, चेन्नई, मोहालीवर अन्याय
केवळ मुंबईच नाही, तर देशातील इतर ऐतिहासिक मैदानांकडेही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. “ईडन गार्डन्स (कोलकाता), एम. ए. चिदंबरम स्टेडियम (चेन्नई) आणि आय. एस. बिंद्रा स्टेडियम (मोहाली) ही मैदानेही फायनलसाठी उत्तम आहेत. पण अचानक सुरू झालेल्या या ‘वशिलेबाजीच्या राजकारणामुळे’ या शहरांवर अन्याय होत आहे,” अशा शब्दांत त्यांनी आयसीसी आणि बीसीसीआयच्या कारभारावर ताशेरे ओढले.
आयसीसीकडून अपेक्षाभंग
आम्ही आयसीसीकडून अपेक्षा करतो की त्यांनी अशा राजकारणात आणि वशिलेबाजीत पडू नये, असा टोलाही त्यांनी लगावला. यापूर्वीचा वनडे वर्ल्डकपचा अंतिम सामनाही अहमदाबादमध्येच झाला होता, याकडे लक्ष वेधत, क्रिकेटमध्ये राजकीय हस्तक्षेपामुळे पारंपरिक क्रिकेट केंद्रांचे नुकसान होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.



Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



