digital products downloads

‘टोलचे पैसे परत करा!’ मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील 32 तासांच्या ट्रॅफिक जॅममुळे राज संतापले; ‘प्रवास किती…’

‘टोलचे पैसे परत करा!’ मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील 32 तासांच्या ट्रॅफिक जॅममुळे राज संतापले; ‘प्रवास किती…’

Mumbai Pune Expressway Issue Raj Thackeray Angry: मुंबई-पुणे एक्सप्रेसवे जवळपास 32 तासांनंतर गुरुवारी मध्यरात्रीनंतर वाहतुकीसाठी सुरु झाला. या मार्गावर गॅस टँकर उलटल्याने मंगळवार सायंकाळपासून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेल्या. त्यामुळे हजारो प्रवाशांचे, ट्रक चालकांचे प्रचंड हाल झाले. शेकडो गाड्या या मार्गावर अडकून पडल्या. 62 किलोमीटर दूरपर्यंत वाहतुककोंडी रांग होती. यामधून 32 तासांनी प्रवाशांची सुटका झाली असली तर सारा प्रकार पाहून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष प्रचंड संतापले आहेत. राज यांनी सोशल मीडियावरुन आपला संताप व्यक्त केला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

फक्त चौकशीचे आदेश

“मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जवळपास 32 तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. आणि यानंतर नेहमीप्रमाणे सरकारकडून या प्रकरणाच्या फक्त चौकशीचे आदेश दिले गेले. या आणि अशा अनेक घटनांच्या अनेक चौकश्या होतात. पुढे त्यातून काही बोध सरकार, प्रसाशन घेतं का?  हा प्रश्न आहे,” असं राज यांनी आपल्या पोस्टच्या सुरुवातीला म्हटलं आहे. 

एकच गोष्ट तत्परतेने केली गेली…

“मंगळवार 3 फेब्रुवारीला संध्याकाळी पाचच्या आसपास गॅसचा टँकर उलटला. त्यानंतर सुरक्षेचा पर्याय म्हणून वाहतूक थांबवली गेली, हे पण योग्य झालं. पण अशा घटना घडल्या तर काय काय उपाययोजना करून कमीत कमी वेळेत रस्ता मोकळा करता येईल याचा कृती आराखडा प्रशासनाकडे तयार होता का? स्व. बाळासाहेबांच्या प्रेरणेतून हा द्रुतगती मार्ग उभा राहिला, त्याला 24 वर्ष उलटली. पण या काळात काय काय आपत्ती येऊ शकते ना याचा विचार केला गेला ना संपूर्ण रस्ता उत्तम दर्जाचा राहील हे पाहिलं गेलं. मधल्या काळात एकच गोष्ट तत्परतेने केली गेली ती म्हणजे टोल वसुली,” असा खोचक टोला राज यांनी लगावला आहे. 

आधी मुंबई-पुणे प्रवास सुरळीत करा

“महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं टोलचं आंदोलन हे टोल घेण्याच्या बाबतीतलं नव्हतंच. ते होतं जर टोल घेता, तर मग सरकार, टोल वसूल करणारी कंपनी काय सुविधा प्रवाशांना देते याबद्दलचं. कालच्या घटनेनंतर हाच प्रश्न आहे की, रस्ता बांधला आणि टोल वसुल केला इतकीच सरकारची जबाबदारी आहे का? परवाच्या अर्थसंकल्पात मुंबई-पुणे हायस्पीड ट्रेनची घोषणा केली गेली. ती होईल तेव्हा होईल. पण त्या आधी मुंबई-पुणे प्रवास सुरळीत करा,” अशी मागणी राज यांनी केली आहे. 

कोडगेपणा अनाकलनीय

“हल्ली मुंबई-पुणे प्रवास हा नक्की किती तासांत होईल याबद्दल कोणीच शाश्वती देऊ शकत नाही. मुंबई आणि पुणे ही या राज्याच्या आणि देशाच्या विकासाची इंजिनं आहेत असं एका बाजूला म्हणायचं आणि 32 तास या दोन शहरांतील वाहतूक ठप्प होते याकडे स्वस्थपणे बघायचं यासाठी लागणारा कोडगेपणा अनाकलनीय आहे,” असंही राज यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधताना म्हटलं आहे. 

टोल परत करा

“ज्या प्रवाशांकडून या काळात टोल वसूल केला गेला तो सरकारने त्यांना परत केला पाहिजे. आणि चौकश्यांचा फार्स न करता या घटनेसकट इतर काय घटना घडू शकतात आणि त्यावर तात्काळ उपाय कसा केला जाऊ शकतो याचा कृती आराखडा तयार करून लोकांसमोर ठेवला पाहिजे. सरकारमध्ये पालकमंत्री असतात आणि या सरकारमध्ये तर पालकमंत्री पदावरून वाद सुरु असतात. पालकत्वाची इतकी आस असलेलं सरकार असून सुद्धा नागरिकांना निराधार वाटावं अशी परिस्थिती का येत आहे याचा सरकारने विचार करावाच,” असा सल्ला राज यांनी दिला आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp