
Monsoon Trekking Andharban Forest Trail: पावसानं (Monsoon News) हजेरी लावल्यानंतर लगेचच ट्रेकिंगची आवड असणाऱ्या अनेकांचेच पाय डोंगरदऱ्यांकडे, रानवाटांकडे वळतात. मात्र सोशल मीडियाची उलपब्धता आणि ‘हिडन जेम’च्या (Hidden Gem) नावाखाली होणारी विविध ठिकाणांची प्रसिद्धी या कारणांमुळं काही उत्साही आणि अतिउत्साही (Trekking) ट्रेकर्सचीसुद्धा यात भर पडत असून, फक्त फोटो आणि आपण अमुक ठिकाणी गेल्याच्या पोस्टसाठी म्हणूनही अशा ट्रेकसाठी आता गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे.
अशाच अतिउत्साहाची प्रचिती नुकतीच (Andharban Trail and Trek) अंधारबन रानवाटेवर आली. जिथं 29 जून 2025 च्या रविवारी आलेल्या ट्रेकर्सची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली, की वनअधिकाऱ्यांना हा ट्रेक दुपारच्याच वेळेत बंद करत इथं येणाऱ्यांना प्रवेश नाकारावा लागला. अतिप्रचंड प्रमाणात वाढलेली गर्दी आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला.
वनसंपदेला धोका…
वनअधिकाऱ्यांच्या माहितीनुसार साधारण 5000 ते 6000 जणांनी आठवडाअखेरीस या रानवाटेवर ट्रेकसाठी हजेरी लावली. प्रत्यक्षा या रानवाटेच्या क्षमतेहून हे प्रमाण अधिक असल्यामुळं वाढत्या गर्दीमुळं इथं कोणताही अनुचित प्रकार किंवा अपघात आणि अगदीच चेंगराचेंगरीसारखी दुर्घटना होण्याची संभाव्य शक्यता असल्यानं वन अधिकाऱ्यांनी हा कठोर निर्णय घेतला. फक्त अपघात किंवा दुर्घटनाच नव्हे, तर रानावनातील जीवसृष्टीलाही मानवी हस्तक्षेपामुळं हानी पोहोचू शकते हा अतिशय महत्त्वाचा मुद्दासुद्धा अधिकाऱ्यांनी अधोरेखित केला.
सोशल मीडियावर अंधारबन ट्रेल इथं झालेली ही गर्दी नेमकी कोणत्या स्वरुपातील होती याची विचार करायला भाग पाडणारी दृश्य समोर आली आणि हे नेमकं काय प्रकरण आहे याचीच प्रचिती अनेकांना आली. दरम्यान अंधारबन क्षेत्रातील वन अधिकारी सागर भोसले यांच्या माहितीनुसार रविवारी साधारण साडेअकरा वाजण्याच्या सुमारासच तिथं वाढती गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आणि त्याच कारणास्तव दुपारीच तिकीट खिडकी बंद करण्यात आली. साधारण 9 वाजल्यापासून तिकीट खिडकीवर येणाऱ्यांची संख्या वाढत गेली आणि फार कमी वेळात तिथं प्रचंड गर्दी झाली.
नव्यानं नियम जारी…
वाढती गर्दी आणि तरुणाईचा अतिउत्साह पाहता अंधारबन वन अधिकाऱ्यांनी काही नियमांमध्ये बदल केले असून, इथं तिकीट खिडकी दोन वाजेपर्यंतच खुली राहील असं स्पष्ट केलं असून, अधिक गर्दीच्या वेळी तिकीट खिडकी निर्धारित वेळेच्या आधीसुद्धा बंद करण्यात येईल. कोणत्याही पूर्वसुचनेशिवाय हा निर्णय घेण्याचा अधिकार वन अधिकाऱ्यांकडे राहील. सध्याच्या घडीला या भागात वन अधिकारी सर्व घडामोडी आणि गर्दीवर लक्ष ठेवत असून, त्यानुसार योग्य ते निर्णय घेत असले तरीहीर सुजाण नागरिक म्हणून इथं येणाऱ्यांनीही भान राखावं असंच आवाहन सातत्यानं करण्यात येत आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.