
Ganeshotsav News Uddhav Visita Raj Thackeray Home: गणेशोत्सवानिमित्त उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचे कुटुंबीय एकत्र आल्याचं चित्र गणेश चतुर्थीच्या दिवशी पाहायला मिळालं. मात्र या भेटीवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सुबुद्धी’चा उल्लेख केल्याने ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खोचक शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय.
फडणवीस नेमकं काय म्हणाले?
मुख्यमंत्री फडणवीसांना ठाकरे बंधू एकत्र आल्याचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी, “श्रीगणेशाने सुबुद्धी दिल्याने दोन्ही भाऊ एकत्रित आले आहेत. ते दोन्ही भाऊ एकत्रित रहावेत. दोन्ही भावांना अशीच सुबुद्धी मिळत रहावी अशी श्रीगणेशाच्या चरणी मी प्रार्थना करतो,” अशी प्रतिक्रिया नोंदवली.
फडणवीस स्वत: राज ठाकरेंच्या घरी गेलेले
यासंदर्भात राऊत यांना पत्रकारांनी विचारलं असता, राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. “देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्या शुभेच्छा या क्षणी महत्वाच्या आहेत. दोन भाऊ एकत्र आहोत हे त्यांना खरोखर मनापासून वाटत आहे आणि मला खात्री आहे. काल स्वतः देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या गणरायाच्या दर्शनाला गेले तिथे हात जोडले. त्यामुळे त्यांनी त्या गणरायाकडे तीच इच्छा व्यक्त केली असेल. महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आणि महाराष्ट्रात सध्या जे राजकीय संकट सुरू आहे ते दूर करण्यासाठी ज्या गणरायांना दोन्ही ठाकरे बंधूंना बळ द्यावं, शक्ती द्यावी नक्कीच देवेंद्रजींची हीच भूमिका असावी,” असं संजय राऊत म्हणाले.
ठाकरेंच्या कृपेने…
“ठाकरे हे महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत. शेलार आणि फडणवीस नाही. ठाकरे यांचीही परंपरा आहे. ती महाराष्ट्रात फार मोठी आहे. तसेच आहे का अजिबात नाही त्याच्यामुळे ठाकरे हे कायम सद्बुद्धी घेऊन जन्माला आलेले आहेत. महाराष्ट्राच्या कल्याणासाठी शिवसेना आणि ठाकरे यांचे कार्य सतत सुरू असतं. शेलार आणि फडणवीस हे मुंबईमध्ये जे वावरत आहेत ते ठाकरेंची कृपा हे त्यांनी मान्य केले पाहिजे. नाहीतर त्यांना कबूतर हा कायदा गुजरातमध्ये जावा लागेल. ठाकरेंशिवाय महाराष्ट्रात एक पाऊल पुढे जाणार नाही मराठ्यांविना राष्ट्र गाडा न चालेल यासाठी ठाकरे यांची गरज आहे, महाराष्ट्राला आहे!” असा टोला राऊतांनी लगावला.
कार्यकर्त्यांना आनंद
दोन्ही सेना एकत्र आल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण होईल का? या प्रश्नालाही राऊतांनी उतत्र दिलं. “कार्यकर्त्यांच्या बाबतीत कोणी चिंता करण्याची गरज नाही कार्यकर्त्यांना माहित आहे काय होणार आहे आणि काय सुरू आहे. कार्यकर्त्यांच्या मनात कोणताही संभ्रम नाही. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन प्रमुख नेते जरी असले राजकारणातले तरी सगळ्यात आधी ते भाऊ आहेत. त्यांच्या एकत्र येण्याने महाराष्ट्रातल्या राजकारणाला नवी दिशा आणि बळकटी मिळेल याची खात्री कार्यकर्त्यांना असल्यामुळे हा गणेशोत्सव त्यांच्यासाठी अधिक आनंद घेऊन आलेला आहे,” असं राऊत म्हणाले.
FAQ
गणेशोत्सव 2025 मध्ये ठाकरे बंधूंची भेट कशी घडली?
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने (27 ऑगस्ट 2025) उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे कुटुंबीय एकत्र आले. ही भेट लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान घडली, जिथे उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र दर्शन घेतले. या भेटीमुळे दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकजुटीची चर्चा सुरू झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंच्या भेटीवर काय प्रतिक्रिया दिली?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंच्या भेटीवर उपरोधिकपणे टिप्पणी केली की, “श्रीगणेशाने सुबुद्धी दिल्याने दोन्ही भाऊ एकत्र आले आहेत. ते दोन्ही भाऊ एकत्र राहावेत आणि त्यांना अशीच सुबुद्धी मिळत राहावी, अशी मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो.”
राऊत यांनी ठाकरे कुटुंबाबाबत काय सांगितले?
राऊत यांनी ठाकरे कुटुंबाला महाराष्ट्राचे शिल्पकार संबोधले आणि सांगितले की, त्यांची परंपरा आणि कार्य महाराष्ट्रात मोठे आहे. त्यांनी ठाकरे कुटुंब नेहमीच सद्बुद्धीने आणि महाराष्ट्राच्या कल्याणासाठी कार्यरत असल्याचे म्हटले. तसेच, फडणवीस आणि शेलार यांचे मुंबईतील राजकीय अस्तित्व ठाकरेंच्या कृपेमुळे आहे, असे उपरोधिकपणे नमूद केले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.