
निलेश खरमरे आणि योगेश खरे (प्रतिनिधी) मुंबई : चंद्रकांत पाटलांनी ठाकरेंच्या शिवसेनेसंदर्भात मोठा दावा केलाय. दरम्यान त्यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. चंद्रकांत पाटलांनी केलेल्या विधानानंतर संजय राऊतांनी देखील प्रत्युत्तर दिलं. चंद्रकांत पाटलांनी त्यांच्या पक्षाची काळजी करावी असा पलटवार राऊतांनी केला आहे.
भाजप आमदार चंद्रकांत पाटलांनी ठाकरेंच्या शिवसेनेसंदर्भात मोठा गौप्यस्फोट केलाय. उद्धव ठाकरेंना सत्तेत यायचंय मात्र, त्यांना कोणी घेत नाही, असा मोठा दावा चंद्रकांत पाटलांनी केलाय. दरम्यान त्यांच्या दाव्यानंतर खासदार संजय राऊतांनी देखील पलटवार केला. शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्यांसोबत जाणार नसल्याचं प्रत्युत्तर राऊतांनी दिलं.
विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठे धक्के बसलेत, अनेक बड्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. दरम्यान हाच धागा पडकत चंद्रकांत पाटलांनी ठाकरेंच्या शिवसेनेला टोला लगावलाय. आगामी पालिका निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला उमेदवार मिळणार नसल्याचा दावाही चंद्रकांत पाटलांनी केला.अमित शाहांच्या रायगड दौऱ्यानंतर संजय राऊतांनी शाहांवर टीकास्त्र डागलं होतं. अमित शाहांनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला आणि औरंगजेबच्या कबरीला समाधीचा दर्जा दिल्याचा आरोप केला होता. दरम्यान राऊतांच्या याच आरोपानंतर चंद्रकांत पाटलांनी ठाकरे गटासंदर्भात मोठे दावे केलेत.
हेही वाचा : गॅस मीटरबाबत सरकारचा मोठा निर्णय! कठोर झाले नियम; ग्राहकांवर काय परिणाम होणार?
काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे, मिलिंद नार्वेकर आणि चंद्रकांत पाटलांची भाजप आमदार पराग अळवणींच्या मुलीच्या लग्नात भेट झाली होती. नव दाम्पत्यास शुभेच्छा देऊन ठाकरे निघाले असताना भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील तिथं दाखल झाले होते. भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे आमने सामने आले. यावेळी तिथं उपस्थित असलेल्या मिलिंदनार्वेकर यांनी चंद्रकांत पाटील यांना मग युती कधी? असा प्रश्न विचारला. यावर चंद्रकांत पाटील यांनी मी या सुवर्णक्षणाची वाट पाहतोय, असं उत्तर दिलं. या उत्तरानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांनी एकमेकांना नमस्कार केला.
संजय राऊतांनी अमित शाहांवर केलेल्या टीकेनंतर भाजप- ठाकरेंच्या शिवसेनेत आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगलाय. दरम्यान याच मुद्द्यावरुन चंद्रकांत पाटलांनी ठाकरेंच्या सेनेबाबत मोठे दावे केलेत. त्यामुळे मविआची साथ सोडून उद्धव ठाकरे सत्तेत जाण्यासाठी तयार होते का? असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होतोय.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.