
मराठा समाजाच्या न्याय मागण्यांसाठी लढत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला ओबीसी एकजूट परिषदेने पाठिंबा जाहीर केला आहेच, मात्र आता मराठीच्या मुद्द्यावर एकत्रित आलेल्या ठाकरे बंधूंनी मराठा समाजाच्या मोर्चाला पाठिंबा द्यावा,असे आवाहन इंडिया अगेन्स
.
राज-उद्धव ठाकरे यांनी मराठीसह मराठा समाजाच्या लढ्यात सहकार्य करावे.राजकीय फायदा न बघता त्यांनी मराठा समाजाच्या आंदोलनाला मदत केली तर, आंदोलनाला आणखी बळ मिळेल असे पाटील म्हणाले.२९ ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या मोर्चात लाखोंच्या संख्येने आंदोलक सहभागी होतील. ओबीसी बांधवांचे देखील आंदोलनाला समर्थन आहेच,मात्र राजकीय पक्षांची सामाजिक बांधिलकी म्हणून मनसे-शिवसेनेने (उबाठा) मोर्चाला पाठिंबा दर्शवावा, असे आवाहन त्यांनी केले.
मराठा आरक्षण अध्यादेशाची अंमलबजावणी करणे, शिंदे समितीला १ वर्षाची मुदतवाढ, मराठा बांधवांवरील सर्व खटले मागे घेणे, हैद्राबाद गॅझेटस लागू करणे, संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींना फाशी शिक्षा देणे यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलेले आहे. राज्य सरकारने अद्याप ही या मोर्चासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही, त्यामुळे सरकारने याबाबत लवकर भूमिका जाहीर करणे महत्वाचे आहे. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता सरकार काय उपाययोजना करणार आहे, याची माहिती असणे आवश्यक असल्याचे पाटील म्हणाले. आंदोलनात राज आणि उद्धव ठाकरे सहभागी झाले तर आनंद होईल, असे पाटील म्हणाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.