
Sharad Pawar On Uddhav-Raj Thackeray Alliance: राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवारांनी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. तर दुसरीकडे त्यांनी राज यांचे चुलत बंधू आणि शरद पवारांच्या पुढाकाराने अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं आहे. पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना शरद पवारांनी ठाकरेंच्या संभाव्य युतीसंदर्भात भाष्य केलं आहे.
राहुल गांधींच्या लेखाबद्दल बोलले
शरद पवारांनी पत्रकारांशी अनोपचारिक चर्चेदरम्यान सध्या राज्याच्या राजकारणामध्ये केंद्रस्थानी असलेल्या अनेक विषयांवर भाष्य केलं. “महाराष्ट्र विधानसभा निवडणूक म्हणजे लोकशाहीचे मॅच फिक्सिंग!” हा राहुल गांधींचा लेख आपण वाचलेला नसून सध्या तो बाजूला ठेवला असून संध्याकाळी वाचणार असल्याचं शरद पवारांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं.
‘माझी अशी इच्छा आहे की…’
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातही शरद पवारांनी आपली इच्छा पत्रकारांसमोर बोलून दाखवली. पुढील काही महिन्यांमध्ये येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्या संस्थांच्या निवडणुकांबद्दल बोलताना शरद पवारांनी, “माझी इच्छा आहे की, महाविकास आघाडी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका एकत्र लढाव्यात,” असं मत व्यक्त केलं आहे.
राज यांना टोल
पत्रकारांनी शरद पवारांना सध्या राज्याच्या राजकारणामध्ये चांगलाच चर्चेत असलेला ठाकरे बंधुंच्या दोन्ही सेनांच्या संभाव्य युतीबद्दल प्रश्न विचारला. राज ठाकरे – उद्धव ठाकरे एकत्र आले तर मुंबई महानगर पालिकेत काय परिस्थिती असेल? असं शरद पवारांना विचारण्यात आलं. यावर शरद पवारांनी राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते मात्र त्यांना मतं मिळत नाहीत असं म्हटलं, “आता पर्यंतचा माझा अनुभव असा आहे की राज ठाकरेंच्या सभाना गर्दी होते मात्र त्यांना मतं मिळत नाहीत,” असं विधान पवारांनी केलं.
उद्धव ठाकरेंचं कौतुक
मात्र त्याचवेळेस युतीमधील दुसरे ठाकरे म्हणजेच महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख असलेल्या उद्धव यांचं कौतुक शरद पवारांनी केलं. राज यांच्या तुलनेत उद्धव यांना मतांमध्ये परिवर्तन करण्यात अधी यश येतं असं विधान पवारांनी केलं आहे. “उद्धव ठाकरेंना मातामध्ये परिवर्तन करण्यात यश येते,” असं विधान शरद पवारांनी केलं आहे.
उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य
शुक्रवारी उद्धव ठाकरेंनी मनसेसोबतच्या संभाव्य युतीबद्दल बोलताना, “जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल,” असं सूचक विधान केल्याने युती होणार अशी चर्चा अधिक जोमाने होऊ लागली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.