
उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संयुक्त मेळाव्याला मराठी जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या मेळाव्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, सत्ताधाऱ्यांच्या प्रतिक्रियांनी वातावरण ताप
.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मेळाव्यावर टीका केली. त्याला उत्तर देताना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्याच शैलीत प्रत्युत्तर दिलं.ठाकरे बंधू एकत्र आले, आणि लगेच सत्ताधाऱ्यांची ‘रुदाली’ सुरू झाली. आता फडणवीस आणि शिंदे यांनी रडण्याचे कार्यक्रम ठेवावेत, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
पब्लिक सब जानती है
संजय राऊत पुढे म्हणाले, जनतेला माहित आहे कोण खरे आणि कोण खोटारडे आहेत. त्यामुळेच लाखोंचा जमाव मेळाव्याला आला. लेखणी आणि वाणीच्या बळावर ठाकरे कुटुंबाने महाराष्ट्रावर आपले अधिराज्य निर्माण केले. यामागे कोणताही दिखावा नाही.
सत्ताधाऱ्यांची दिशाभूल
ठाकरे बंधू एकत्र आल्यापासून सत्ताधाऱ्यांचे संतुलन बिघडले आहे. त्यांच्या प्रतिक्रियांमधून दिशाभूल दिसून येते. बुद्धी भ्रमित झालेली असल्याचेच हे लक्षण आहे, असे संजय राऊत म्हणाले.वरळी डोम मैदानावरील मेळाव्यानंतर हिंदी सक्तीविरोधात देशभरात चर्चेला उधाण आले आहे. “अनेक राज्यांतील नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधून पाठिंबा दर्शवला आहे. केंद्राच्या हिंदी सक्तीविरोधात लढण्यास ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने बळ मिळालं आहे, अशी माहिती राऊत यांनी दिली.
‘जय गुजरात’वर खोचक टीका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘जय गुजरात’ घोषणेबाबतही राऊत यांनी टोकाची टीका केली. ते आता पारंपरिक पदार्थांऐवजी ढोकळा खातात, आणि त्यांच्या प्रतिमेतच मोठा बदल झालेला आहे. ही खरी महाराष्ट्राची ओळख नाही, असे त्यांनी म्हटले. एकनाथ शिंदे यांची ती दाढी नकली आहे, ती अमित शहा कधी कातरतील त्यांना कळणारही नाही. ती गद्दाराची दाढी आहे. अफजल खानाची दाढी आहे. ती शाहिस्तेखानाची दाढी आहे, असेही संजय राऊत म्हणाले
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.