
BMC Election Exit Poll: सर्वात श्रीमंत महापालिका असणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतदान झालं असून, आता सर्वांच्या नजरा निकालाकडे आहे. मुंबईवर मागील 25 वर्षांपासून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं नेतृत्व असून, भाजपाकडून यावेळी भगवा फडकावण्याचा प्रयत्न आहे. मुंबई महापालिकेसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा युती केली असून शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसही सोबत आहे. दुसरीकडे भाजपा आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना मुंबईत स्वतंत्र लढत आहे. यादरम्यान एक्झिट पोलचे आकडे समोर आले असून, यामध्ये सत्तेच्या चाव्या नेमक्या कोणाच्या हातात जातील यासंदर्भात अंदाज वर्तवण्यात आले आहेत.
कोणाच्या एक्झिट पोलमध्ये काय आहे?
मुंबईत 227 जागांसाठी निवडणूक असून, सत्तेत येण्यासाठी 114 चं बहुमत गाठावं लागणार आहे. एक्झिट पोलचे अंदाच पाहता मुंबईत भाजपा-शिवसेना म्हणजेच महायुतीची सत्ता येण्याची शक्यता आहे. तसंच ठाकरे बंधूंना मोठा धक्का मिळू शकतो.
1) जेव्हीसी एक्झिट पोल
जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार, मुंबईत भाजपा आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना सत्तेत येण्याची शक्यता आहे. महायुतीला 138 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला असून, ठाकरे बंधूंना फक्त 59 जागी यश मिळेल असा अंदाज आहे. काँग्रेस आणि इतरांना मिळून 30 जागीच विजय मिळेल असा अंदाज आहे.
जेव्हीसानुसार, भाजपाला 97 ते 108 , शिवसेनेला 32 ते 38, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 52 ते 59, मनसेला 2 ते 5 आणि काँग्रेसला 21 ते 25 जागा मिळण्याची शक्यता आहे. 6 ते 9 इतर उमेदवार जिंकतील असा अंदाज आहे.
महायुती – 138
ठाकरे बंधू – 59
काँग्रेस वंचित – 23
इतर – 7
2) डीव्ही रिसर्च
डीव्ही रिसर्चनेही मुंबई महापालिकेत महायुतीची सत्ता येतील असा अंदाज वर्तवली आहे. डीव्ही रिसर्चच्या एक्झिट पोलनुसार, महायुतीला 107 ते 122 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर ठाकरे बंधू 68 ते 83 जागा जिंकतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय काँग्रेसला 18 ते 25 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 2 ते 4, इतरांना 8 ते 15 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महायुती – 107-122
ठाकरे बंधू – 68-83
काँग्रेस वंचित – 18-25
राष्ट्रवादी – 2-4
इतर – 8-15
3) जनमत एक्झिट पोल
जनमत एक्झिट पोलने महायुतीला एकहाती सत्ता मिळेल असा अंदाज वर्तवला आहे. जनमतच्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला 138 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला असून, ठाकरे बंधू फक्त 62 जागी विजयी होतील अशी शक्यता वर्तवली आहे. काँग्रेस-वंचितला 20 तर इतरांना 7 जागी विजयी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महायुती – 138
ठाकरे बंधू – 62
काँग्रेस वंचित – 20
इतर – 7
4) अॅक्सिस एक्झिट पोल
अॅक्सिस एक्झिट पोलनेही महायुतीला पसंती दर्शवली आहे. या एक्झिट पोलनुसार, महायुतीला बहुमताचा आकडा पार करेल. महायुतीला 131 ते 151 जागा मिळतील असा अंदाज आहे, तर ठाकरे बंधू 58 ते 68 जागा जिंकण्यातच यशस्वी होतील असा अंदाज आहे. काँग्रेसचे उमेदवार 12 ते 16 जागांवर विजयी होईल असा अंदाज आहे.
महायुती – 131-151
ठाकरे बंधू : 58-68
काँग्रेस वंचित: 12-16
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



