
BJP Win All Seats Against Uddhav Thackeray Raj Thackeray: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची पूर्वतालीम म्हणून ज्या निवडणुकीकडे पाहिलं जात होतं त्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीविरुद्ध भारतीय जनता पार्टी अशी थेट लढत होती. या निवडणुकीमध्ये ‘ठाकरे’ ब्रँडला धक्का पोहचवणारा निकाल लागला आहे. ठाकरेंना या निवडणुकीत एकही जागा जिंकता आलेली नाही. सर्वच्या सर्व जागा भाजपाने जिंकल्या असून हा ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
निवडणुकाला विशेष महत्त्व
मुंबईमध्ये शनिवार सायंकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरु असताना सोमवारी शहरात मुसळधार पावसातही बेस्टच्या 35 आगारांत बेस्ट क्रेडिट सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. विशेष म्हणजे या निवडणुकीमध्ये 83 टक्के मतदान झाले. या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी पार पडली. बेस्ट उपक्रमावर कोणाचा वचक राहणार हे आजच्या निकालातून स्पष्ट झालं आहे. गेल्या चार वर्षापासून रखडलेल्या बेस्ट पतपेढीच्या पंचवार्षिक निवडणूक मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झाल्याने त्यांना वेगळे महत्त्व प्राप्त झालेलं. असं असतानाच या निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या युतीला भोपळाही फोडता आला नाही.
निकाल काय लागला?
बेस्ट पतपेढीतील 9 वर्षाची सत्ता ठाकरेंच्या शिवसेनेने गमावली आहे. बेस्ट युनियनचे नेते शशांक राव यांच्या सर्वाधिक 12 जागा तर भाजपच्या 9 जागा निवडणून आल्या. ठाकरे बंधुच्या उत्कर्ष पॅनलला भोपळाही फोडता आला नाही.
शशांक राव पॅनल – 12
प्रसाद लाड पॅनल – 09
मनसे – शिवसेना – 00
कशी झाली लढत?
सर्व 21 च्या 21 जागा ‘समृद्धी पॅनल’ने जिंकल्या आहेत. ‘उत्कर्ष पॅनल’मधून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या मनसेनं निवडणूक लढवली. उद्धव यांच्या पक्षाने 9 आणि मनसेनं 2 जागा लढवल्या. मात्र त्यांना एकही उमेदवार निवडून आणता आला नाही. समर्थ बेस्ट कामगार संघटना, बेस्ट राष्ट्रीय कर्मचारी सेना, दि इलेक्ट्रिक युनियन, एस् सी एस् टी वेल्फेअर असोसिएशन, बहुजन एम्प्लॉइज युनियन या पाच संघटनाचे सहकार समृद्धी पॅनल एकत्र येऊन लढत आहेत, तर मनसे आणि उद्धव ठाकरे यांचे उत्कर्ष पॅनल यांच्या विरोधात उभे ठाकले होते. सोमवारी मतदानाच्या दिवशी 15 हजार 123 मतदारांपैकी 12 हजार 656 मतदारांनी मत दिले.
लाड यांनी ठाकरेंना डिवचलं
‘जागा दाखवली’ असं म्हणत भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रसाद लाड यांनी ठाकरे बंधुंना टोमणा मारला आहे. “बेस्ट इलेक्शनमध्ये ‘ठाकरे’ ब्रँड 21 समोर 000,” असं वाक्य लाड यांनी पोस्ट केलेल्या फोटोत आहे. तसेच पुढे, “00/21 म्हणजे ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकू शकले नाहीत,” असंही लाड यांनी शेअर केलेल्या फोटोत म्हटलं आहे. फेसबुकवर ‘उबाठा आता तरी हवेतून खाली या,’ असा खोचक सल्ला प्रसाद लाड यांनी दिला आहे.
जागा दाखवली…. pic.twitter.com/waPJMkMuL9
— Prasad Lad (@PrasadLadInd) August 19, 2025
आधीच व्यक्त केलेला विश्वास
निकाल लागण्याआधीच प्रसाद लाड यांनी विजय 100 टक्के मिळणार आहे, असा विश्वास व्यक्त केला होता. ज्या पद्धतीने मोठा पाऊस असतानाही 83.69 टक्के मतदान झाले हा परिवर्तनाचा विजय आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधातला असंतोष आणि आम्ही दिलेली वचने पूर्णत्वाकडे नेण्यासाठी कामगारांनी केलेले हे भरघोस मतदान आहे. 21 पैकी 21 जागा आम्ही जिंकू आणि हा विजय कामगारांसाठी समर्पित असेल, असं लाड यांनी म्हटलं होतं. त्यांनी व्यक्त केलेला विश्वास खरा ठरलाय.
FAQ
बेस्ट क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीचं महत्त्व काय आहे?
ही निवडणूक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (UBT) आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्या युतीची पहिली लिटमस टेस्ट मानली जात आहे. मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीपूर्वी ही निवडणूक दोन्ही पक्षांच्या एकत्रित ताकदीचे संकेत देईल. तसेच, बेस्ट उपक्रमावर कोणाचा प्रभाव राहील हे या निकालातून स्पष्ट होणार आहे.
ही निवडणूक कधी आणि कुठे झाली?
ही निवडणूक 18 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईतील बेस्टच्या 35 आगारांमध्ये घेण्यात आली. मतमोजणी आज म्हणजेच, 19 ऑगस्ट 2025 रोजी होत आहे.
या निवडणुकीत किती मतदान झालं?
मुसळधार पावसातही 15123 मतदारांपैकी 12656 मतदारांनी मतदान केलं, म्हणजेच 83.69 टक्के मतदान झालं.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.