
Thane Traffic Update: मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात मोठ्या प्रमाणात मेट्रोचे जाळे पसरवण्यात येत आहे. अनेक मेट्रो प्रकल्पांची कामे वेगाने सुरू आहेत. मेट्रोच्या या कामांमुळं अनेक भागांत खोदकाम करण्यात येत आहे. त्यामुळं रस्ते बंद करण्यात येत आहेत. घोडबंदर भागात सध्या मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून माजीवडा मेट्रो स्टेशन येथे उभारण्यात आलेल्या मेट्रो स्टेशनवर मेट्रोचे छत उभारण्यासाठी कॉलम उभे केले जाणार आहेत. 5 एप्रिल ते 20 एप्रिल दरम्यान मेट्रोचे हे काम चालणार आहे. मेट्रोच्या या कामामुळं ठाण्यात वाहतूकीत बदल करण्यात येणार आहेत.
माजीवडा मेट्रो स्टेशन येथे उभारण्यात आलेल्या मेट्रो स्टेशनवर 5 एप्रिल ते 20 एप्रिल दरम्यान मेट्रोचे छत उभारण्यासाठी कॉलम उभे केले जाणार आहेत. त्यावर जॅक बीम टाकून जॅक बीम उभारल्यानंतर राफ्टर उभारला जाणार आहे. या काळात येथील वाहतुकीत बदल करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे वाहतूक विभागाने दिली आहे. परंतु या कामामुळे वाहतूककोंडीत आणखी भर पडण्याची चिन्हे आहेत. मेट्रोच्या छताचे काम 60 टनी मोबाइल क्रेनच्या साहाय्याने करण्यात येणार
आहे. त्यासाठी ही क्रेन मुंबई, नाशिक, घोडबदंर, माजीवडा उड्डाणपुलावरील मुख्य वाहिनीवर ज्युपिटर चढणी या ठिकाणी उभी करून हे काम होणार आहे. त्यासाठी माजीवडा ब्रिजवरून मुंबईकडून नाशिक अथवा घोडबंदरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करावी लागणार आहे. त्यामुळे या परिसरात वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक विभागाने वाहतुकीत बदल केले आहेत.
माजिवडा उड्डाणपूल 15 दिवस बंद
माजिवडा उड्डाणपूल 15 दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळं मुंबईहून नाशिक अथवा गुजरातकडे जाणारी वाहतूक या पुलावरुन बंद असणार आहे. वाहतूक विभागाने पर्यायी मार्ग उपलब्ध करुन दिला आहे.
असा करावा लागेल प्रवास
-मुंबईकडून घोडबंदर अथवा भिवंडीकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना विवियाना मॉल समोरील ब्रीज चढणीच्या सुरुवातीला दुभाजकाजवळ प्रवेश बंद केला जाणार आहे. ही वाहने ज्युपिटर हॉस्पिटल समोरील स्लीप रोडने जाऊन कापूरबावडी मार्गे इच्छीत स्थळी जातील.
– नाशिककडे जाणाऱ्या वाहनाही ब्रिज चढणीच्या सुरुवातीला प्रवेश बंद करण्यात येणार आहे. त्यांनाही स्लीप रोडने जाऊन गोल्डन क्रॉसमार्गे पुढे जावे लागणार आहे. हे वाहतूक बदल 5 एप्रिल पासून 19 एप्रिलपर्यंत रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत लागू असणार आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.