
Thane-Borivali Twin Tunnel: ठाणे ते बोरिवली अंतर गाठण्यासाठी दीड ते पाऊण तासांचा वेळ लागतो. मात्र हे अंतर कमी करण्यासाठी एमएमआरडीए दुहेरी बोगदा प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या प्रकल्पाचे काम सुरू आहे. अखेर या प्रकल्पाबाबत एत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ठाणे-बोरिवली ट्विन टनेल आणि ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह प्रकल्पासाठी निधी मिळवण्याचा मा्ग मोकळा झाला आहे.
ट्विन टनल आणि ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह या दोन्ही प्रकल्पासाठी मिळून 300 कोटी रुपये एमएमआरडीएला मिळाले आहेत. राज्य सरकारने हा निधी देण्यासाठी मंजुरी दिली असून ठाणे-बोरीवली ट्वीन टनेलसाठी 210 कोटी रुपये आणि ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह प्रकल्पासाठी 90 कोटी रुपये असा निधी मिळणार आहे.
ठाणे-बोरिवलीदरम्यान 11.85 किमी लांबीच्या मार्गाची उभारणी एमएमआरडीएकडून केली जाणार आहे. या मार्गावर 10.25 किमी लांबीच्या बोगद्याचा समावेश आहे. संजय गांधी नॅशनल पार्कच्या पोटातून हा बोगदा जाणार आहे. या बोगद्यासाठी 18,838 कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे बोलले जातेय. तसंच, याला महत्त्वाकांक्षी नागरी परिवहन प्रकल्पाचा दर्जा दिला आहे. या बोगद्यामुळं ठाणे ते बोरीवली प्रवास अवघ्या 12 मिनिटांत पूर्ण होणार आहे. तसंच, घोडबंदरची वाहतूककोंडीदेखील कमी होणार आहे.
ठाणे ते बोरिवली या दुहेरी भुयारी मार्गामुळे घोडबंदर रोड आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कमी होईल आणि या क्षेत्राच्या वाढीस चालना मिळेल असा अंदाज आहे. दोन्ही बोगद्यांमध्ये दोन मार्गिका आणि एक आपत्कालीन मार्गिका असणार आहे.. त्यामुळे ठाणे ते बोरिवली प्रवास विनाथांबा आणि सिग्नलरहित करता येणार आहे.
FAQ
1. ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प काय आहे आणि त्याचा उद्देश काय?
उत्तर: हा एमएमआरडीएचा महत्त्वाकांक्षी नागरी परिवहन प्रकल्प आहे, ज्यामुळे ठाणे ते बोरिवलीचे अंतर सध्या १.५ ते १.७५ तासांऐवजी अवघ्या १२ मिनिटांत पूर्ण होईल. हा ११.८५ किमी लांबीचा मार्ग असून, त्यातील १०.२५ किमी बोगदा संजय गांधी नॅशनल पार्कमधून जाईल.
2. या प्रकल्पासाठी किती निधी मंजूर झाला आहे?
राज्य सरकारने ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा आणि ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह या दोन्ही प्रकल्पांसाठी मिळून ३०० कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. यापैकी दुहेरी बोगद्यासाठी २१० कोटी रुपये आणि ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह प्रकल्पासाठी ९० कोटी रुपये मिळतील.
3. प्रकल्पाची अपेक्षित किंमत किती आहे?
ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्यासाठी एकूण १८,८३८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असून, आता निधी मिळाल्याने पुढील प्रगती होईल.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.