
Thane Viral Video: ठाण्यामध्ये एका परप्रांतीय रिक्षाचालकाने दारु पिऊन धुडगूस घातला होता. यावेळी त्याने “ये ठाणे का गांधीनगर है, यहा भैय्या का राज चलता है” अशा शब्दांत आव्हान दिलं होतं. इतकंच नाही तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाणे–पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याविरोधात अयोग्य व अभद्र भाषा वापरली होती. मूळचा उत्तर प्रदेशचा असणाऱ्या रिक्षाचालकाने किरकोळ वादातून वाद घातल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हे प्रकरण तापल्यानंतर त्याने आता मराठी माणसाची आणि राज ठाकरेंची कान पकडून माफी मागितली आहे. मनसैनिकांच्या हाती लागण्याआधीच परप्रांतीय रिक्षा चालकाने पोलीस स्टेशन गाठले आणि शरणागती घेतली
नेमकं काय झालं होतं?
ठाण्यात पोखरण रोड नं. 2, गांधीनगर येथील अनिल वाइन्स समोर रविवारी रात्रीच्या सुमारास धक्कादायक घटना घडली होती. किरकोळ वादातून एका ऑटोचालकाने, जो उत्तर प्रदेशचा रहिवासी असल्याचे सांगितले जाते त्याने राज ठाकरे आणि ठाणे–पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याबद्दल अयोग्य व अभद्र भाषा वापरली.
”ये ठाणे का गांधीनगर है, यहा भैय्या का राज चलता है”, ”इधर कोई भी मराठी आया तो उसकी…”, अशा शब्दांत त्याने धमकावलं होतं. गाडी लावण्यावरुन झालेल्या वादातून परप्रातींयाने दारु पिवून धुडगूस घातला होता.
ठाण्यातील गांधीनगर परिसरातील काही परप्रांतीय तरुणांनी मराठी तरुणाला शिविगाळ करुन हुसकावून लावले. ठाणे गांधीनगर पोखरण रोड नंबर 2 येथील घटना आहे.
कान पकडून मागितली माफी
रिक्षाचालकाने अखेर मराठी माणसाची आणि राज ठाकरेंची कान पकडून माफी मागितली आहे. रिक्षा चालकांचं नाव शैलेंद्र यादव आणि राकेश यादव आहे. शैलेंद्र यादव याला पोलिसांनी अटक केली आहे तर राकेश यादव हा आरोपी फरार आहे.
मनसैनिकांच्या हाती लागण्याआधीच परप्रांतीय रिक्षाचालकाने पोलीस स्टेशन गाठले आणि शरणागती घेतली. मात्र मनसैनिक अजूनही संतापले असून याला मनसे स्टाईल उत्तर देण्यावर ठाम आहेत.
“मी विनंती करत आहे आणि सर्वांची माफी मागत आहे. मी काल गांधीनगर येथे शिवसेना कार्यालयासमोर रिक्षा लावत होतो. त्यावेळी तिथे एक व्यक्ती आली असता त्याच्याशी वाद झाला. यावेळी मराठी आणि भैय्या असा वाद झाला. माझ्या तोंडून माननीय राजसाहेब आणि अविनाश जाधव साहेब यांना शिवी दिली. यासाठी मी हात जोडून माफी मागत आहे,” असं तो माफी मागताना म्हणाला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



