
Ghodbunder Road To Fountain Hotel Tunnel: घोडबंदर रोड आणि फाउंटन जंक्शन येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. मात्र लवकरच या दोन ठिकाणावरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. यासाठी एमएमआरडीएने या साठी मास्टर प्लान तयार केला आहे. एमएमआरडीने अलीकडेच अर्थसंकल्प सादर केला आहे. यावेळी मुंबई व मुंबई महानगर प्रदेशातील अनेक प्रकल्पाची माहिती एमएमआरडीएने दिली आहे. यावेळी ठाणे घोडबंदर रस्त्यावरील गायमुख ते फाउंटन हॉटेल जंक्शन पर्यंताच्या भुयारी मार्गाचा अर्थसंकल्पात समावेश केले आहे.
घोडबंदर रोड येथे नेहमीच वाहतूक कोंडी होते. अनेकदा 30 ते 40 मिनिटे वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते. तसंच, फाउंटन जंक्शन येथेही ट्रॅफिक जॅमची समस्या नेहमीची आहे. फाउंटन जंक्शन येथून वसईला जाता येते. या समस्येवर मात करण्यासाठी एमएमआरडीए ठाणे घोडबंदर रस्त्यावरील गायमुख ते फाउंटन हॉटेल जंक्शनपर्यंत भुयारी मार्ग बांधणार आहे. या प्रकल्पासाठी 1,200 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे.
घोडबंदर रोडवरील गायमुख ते फाउंटन हॉटेल जंक्शनपर्यंतचा रस्ता सध्या चौपदरी आहे. ठाणे शहर आणि राष्ट्रीय महामार्ग विभागांना जोडल्यामुळे येथे प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्यामुळं येथे उन्नत मार्ग व्हावा, अशी मागणी कित्येत दिवस होत होती. अखेर या प्रकल्पाची आखणी करण्यात येत आहे.
गायमुख ते फाऊंटन हॉटेल या प्रकल्पात दोन स्वतंत्रय भुयारी बोगदे निर्माण करण्यात येणार आहेत. याप्रकल्पाची एकूण लांबी 5.5 किमी असून अंतर्गंत प्रत्येकी 3.5 किमी लांबीचे दोन बोगदे आहे. हे बोगदे सहा पदरी बांधण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळं ठाण्यावरून वसई-विरार तसेच भाईंदरकडे जाणाऱ्या प्रवाश्यांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. ठाण्यावरुन वसई व विरारला जाणे आणखी सोप्पे होणार आहे.
गायमुख ते फाऊंटन हॉटेल जंक्शनबोरबरच भाईंदर ते फाऊंटन हॉटेलपर्यंतही भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे. त्यामुळं गायमुख ते वसई भुयारी मार्गाने येणाऱ्या वाहनांना पुढे मीरा रोड, भाईंदरला अतिवेगाने जाता येणार आहे. फाउंटन हॉटेल जंक्शन ते भाईंदर पर्यंत उन्नत मार्ग बांधण्यासाठी 1,000.00 कोटींचा खर्च येणार आहे. ठाणे घोडबंदर रोडवरील फाउंटन हॉटेल जंक्शन ते भाईंदर पर्यंत उन्नत रस्त्याचे डिझाइन आणि बांधकामाचे काम हाती घेण्यात आले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.