
TMC Elections Exit Poll 2026 : महाराष्ट्रात गुरुवार 15 जानेवारी रोजी तब्बल 29 महापालिकांसाठी मतदान पार पडलं. यापैकी मुंबई नंतर सर्वात चर्चेत असणारी महापालिका असणाऱ्या ठाणे महापालिकेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक जवळपास 9 वर्षांनी झाल्या. ठाण्यातील मतदारांनी गुरुवारी मतदानासाठी बाहेर पडून लोकशाहीचा उत्सव साजरा केला. अशातच आता शुक्रवार 16 जानेवारी रोजी इतर महापालिकांप्रमाणेच आता ठाणे महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल (Thane Municipal Corporation Elections) सुद्धा जाहीर होतील. मतदानानंतर समोर येत असलेल्या आकडेवारीनुसार ठाण्यात शिवसेना आणि भाजप युतीला मतदार राजाचा सर्वाधिक कौल मिळण्याची शक्यता आहे. एवढंच नाही तर शिवसेनेला ठाण्यात कधीही न मिळालेलं एवढं अभूतपूर्व यश मिळण्याची शक्यता विविध एक्सिट पोलमधून वर्तवण्यात आली आहे.
ठाण्यात कोणी किती जागा लढवल्या?
ठाण्यात यंदाच्या महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना – भाजप यांची युती होती तर शिवसेना UBT, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस SP यांची आघडी होती. ठाणे महापालिकेचे एकूण 131 प्रभाग आहेत. शिवसेना – भाजप युतीमध्ये सर्वाधिक 84 जागा या शिवसेनेने लढवल्या तर 40 जागा या भाजपने लढवल्या. तर शिवसेना UBT ने 53 तर मनसेने 23 तर राष्ट्रवादी काँग्रेस SP ने 64 जागा लढवल्या. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हे 66 तर काँग्रेसने 61 जागा लढवून ते स्वतंत्र निवडणुकीला सामोरे गेले. तर ठाण्यात 265 उमेदवारांनी निवडणूक लढवली.
काय सांगतो एक्सिट पोल?
रूद्रा आणि जेडीएस यांचा ठाणे महापालिका निवडणुकी संदर्भातला एक्सिट पोल समोर आलेला आहे. त्यानुसार ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. दोन्ही एक्सिट पोलनुसार शिवसेनेला ठाण्यात यंदा अभूतपूर्व यश मिळणार आहे.
जेडीएसच्या एक्सिट पोलनुसार ठाण्यात शिवसेना बहुमताचा आकडा पार करून 69-76 एवढ्या जागा जिंकण्याची शक्यता आहे. तर भाजपाला 26-30 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना UBT ला 0-2 एवढ्या जागांवरच समाधान मानावं लागेल तर मनसे पक्षाला ०-१ जागा मिळतील तसेच राष्ट्रवादी SP पक्षाला १२-१६ जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाला ठाण्यात 1 ते 2 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेसला 6-8 जागा मिळण्याची शक्यता आहे. ठाण्यात अपक्षांना 2 ते 4 जागांवर यश मिळेल अशी शक्यता जेडीएसच्या एक्सिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे.

रुद्राच्या एक्सिट पोलनुसार ठाण्यात शिवसेना बहुमताचा आकडा पार करून 50-55 एवढ्या जागा जिंकण्याची शक्यता आहे. तर भाजपाला 25-30 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना UBT ला 8-12 एवढ्या जागांवरच समाधान मानावं लागेल तर मनसे पक्षाला २-४ जागा मिळतील तसेच राष्ट्रवादी SP पक्षाला १२-१५ जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाला ठाण्यात 1 ते 2 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेसला 5-8 जागा मिळण्याची शक्यता आहे. ठाण्यात अपक्षांना 5 ते 7 जागांवर यश मिळेल अशी शक्यता रुद्राच्या एक्सिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे.
शिंदे बालेकिल्ल्यात पुन्हा रेकॉर्डब्रेक जागा जिंकणार?
ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जातो. तेव्हा एक्सिट पोलनुसार ठाण्यात शिवसेनेला अभूतपूर्व यश मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी 2017 मध्ये शिवसेना एकसंध असताना शिंदे त्यांच्या नेतृत्वात शिवसेनेला 67 जागा जिंकता आल्या होत्या. यावेळी त्यांना महापालिकेत स्पष्ट बहुमतासह सत्ता मिळाली होती. त्यावेळी सुद्धा ठाणे महापालिका निवडणुकीतील शिवसेनेनं रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली होती. मात्र यावेळी त्याहीपेक्षा जास्त म्हणजेच 72 जागा शिवसेना जिंकेल असा अंदाज आहे. 2017 च्या तुलनेत शिवसेना आणि भाजपच्या 5 ते 3 जागा वाढण्याची शक्यता आहे.
धर्मवीर आनंद दिघे हे एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरु आहेत. मात्र स्वर्गीय आनंद दिघे यांच्या नेतृत्वात सुद्धा शिवसेनेला महापालिकेवर बहुमताची सत्ता आणता आलेली नव्हती. मात्र एकनाथ शिंदे यांनी 2017 मध्येच 67 जागा जिंकून विक्रम रचला होता. मात्र यंदा 2026 च्या महापालिका निवडणुकीत शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेना ही 72 जागांचा अभूतपूर्व आकडा पार करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जे आनंद दिघेंना जमलं नाही ते एकनाथ शिंदे ठाण्यात करून दाखवणार अशी शक्यता आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



