
Ganesh Naik Vs Eknath Shinde: गणेश नाईक आणि शिंदेंच्या शिवसेनेमधला सामना अजूनही सुरूच आहे. पुन्हा एकदा जनता दरबार घेत गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंचं नाव न घेता त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय. मला खुर्ची, सत्ता आणि पैशांचं मोह नाहीये तसंच ठाण्यात माझ्या रेंजचा नेता नाही म्हणत असं म्हणत गणेश नाईकांनी पुन्हा एकदा शिंदेंवर निशाणा साधल्याची चर्चा आहे…
गणेश नाईकांच्या या वक्तव्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी थेट बोलणं टाळलं, ते काय म्हणाले माहित नाही. मात्र त्यांना विचारून मी तुमच्याशी बोलणार असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलंय. ते कोणाबद्दल
बोलले हे माहित नाही नाईकांना विचारून मी बोलतो, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय.
याआधी देखील गणेश नाईकांनी अनेकदा एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलंय. नवी मुंबईत सत्ता मिळवून दिलीय. ठाण्यातही सत्ता मिळवून देऊ शकतो मात्र, त्यासाठी रावणाच्या अंहकाराचं दहन करावं लागेल असा हल्लाबोल गणेश नाईकांनी केला होता.
गणेश नाईकांचा, शिंदेंवर निशाणा?
9 सप्टेंबरला गणेश नाईकांच्या उपस्थितीत ठाण्यात भाजप कार्यकर्ते, पदाधिका-यांची बैठकीत नवी मुंबई महापालिकेत मी पक्षाला सत्ता मिळवून दिली, ठाण्यातही मी सत्ता मिळवून देऊ शकतो, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यासाठी रावणाच्या अंहकाराचे दहन करावे लागले. त्यासाठी तुम्ही तयार आहात का?, कार्यकर्त्यांना विचारणा
2 एप्रिल रोजी एकनाथ शिंदेंच्या काळात कामं झाली नसल्याची टीकाही गणेश नाईकांनी केलेली
27 जूनला नवी मुंबईचे वैरी बाहेरचे आहेत, असं म्हणत नाईकांचा एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष निशाणा
18 ऑगस्ट रोजी एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली आणि मुख्यमंत्री झाले, कमावलेलं टिकवता आलं पाहिजे, नाईकांचा टोला
गणेश नाईकांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी देखील पलटवार केला होता. नरेश म्हस्केंनी थेट गणेश नाईकांसह भाजपला युतीधर्म बाजूला
ठेवून उत्तर देण्याचा इशारा दिला होता. आमच्या नेत्यावर टीका केल्यास, युतीधर्म बाजूला ठेवून उत्तर देऊ, असा इशारा शिवसेना नेत्यांनी दिला होता.
मागील अनेक दिवसांपासून गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा सामना सुरू आहे. ठाण्यात जनता दरबार घेत गणेश नाईकांनी वारंवार नाव न घेता शिंदेंना
कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, आज पुन्हा एकदा जनता दरबाराच्या माध्यमातून त्यांनी नाव न घेता एकनाथ शिंदेंवर शरसंधान साधलंय.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



