
जनकल्याण सेवा संस्था संचालित डॉ. हेडगेवार हॉस्पिटलने वीर वामनराव जोशी शाळेतील १७८ विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले. हे दोन दिवसीय शिबिर श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ संचालित शाळेत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी होते. बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रज्ञा बनसोड आणि डॉ. वसुंधरा घोडेस्वार यांनी या शिबिरात १७८ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. यामध्ये विद्यार्थ्यांचे वजन आणि उंची मोजण्यात आली. मुख्याध्यापक दिलीप सदार आणि शिक्षकांनी शिबिराचे नियोजन केले होते. यावेळी उपस्थित पालकांनी डॉ. बनसोड यांच्याशी संवाद साधून आरोग्याशी संबंधित प्रश्न विचारले आणि त्यांच्या शंकांचे निरसन करून घेतले. डॉ. हेडगेवार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या रुग्ण तपासणी, भरती उपचार आणि विविध शस्त्रक्रियांबद्दलची माहितीही उपस्थित विश्वस्त, शिक्षक आणि पालकांना देण्यात आली. शिबिराच्या सुरुवातीला शाळेतर्फे डॉ. बनसोड आणि त्यांच्या चमूचे स्वागत करण्यात आले. जनकल्याण सेवा संस्थेचे सदस्य अरुण बांबल यांनी शिबिराला भेट देऊन समाधान व्यक्त केले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी वैभव इंगळे, मयुरी चौधरी, नांदापुरे, आकाश काळे, अनिता कुलकर्णी, मोनिका पाटील, ज्योती मडावी, सुजित खोजरे, आसावरी सोवळे, सचिन वंदे, मनिषा श्रीराव, विलास देणे, अमोल पाचपोर आणि चित्राताई यांनी सहकार्य केले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



