
Dombivali Mankoli Bridge: डोंबिवली माणकोली उड्डाण पूल चार दिवस वाहतुकी साठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दीड दिवस, पाच दिवसांचे आणि गौरी विसर्जन व अनंत चतुर्थीला माणकोली पुलावरून वाहनांना नो एंट्री असणार आहे. तसंच, वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग जाहीर करण्यात आले असून “नियम पाळा, सहकार्य करा” असं अवाहनदेखील डोंबिवलीकरांना वाहतूक पोलिसांनी अवाहन केलं आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून डोंबिवलीचे गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाच्या विसर्जनासाठी मोठागाव रेतीबंदर खाडी किनाऱ्यावरील गणेशघाटाला प्राधान्य देतात. दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी इथे प्रचंड गर्दी होते. डोंबिवली शहर परिसरातील गणेश भक्त रेतीबंदर चौक, रेतीबंदर रेल्वे फाटक, आणि माणकोली उड्डाण पूल या मार्गाने पायी किंवा वाहनांनी विसर्जनासाठी जातात. मात्र, माणकोली पूल सुरू झाल्यापासून मुंबई, ठाणे आणि भिवंडी परिसरातील अनेक प्रवासी या मार्गाचा वापर करत आहेत. त्यामुळे रेतीबंदर रेल्वे फाटक, उमेशनगर, पंडित दीनदयाळ रस्ता आणि माणकोली पूल परिसर नेहमीच गजबजलेला असतो.
गणेश विसर्जनाच्या गर्दीमध्ये आणखी वाहने आल्यास अभूतपूर्व वाहतूक कोंडी होऊ शकते, हे लक्षात घेऊन वाहतूक विभागाने २८ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट, २ सप्टेंबर आणि ६ सप्टेंबर या चार दिवशी माणकोली पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे
वाहतुकीतील महत्त्वाचे बदल आणि पर्यायी मार्ग
ठाणे-मुंबईकडून येणारी वाहने: मुंबई-नाशिक महामार्गावरून माणकोली पुलाकडे येणाऱ्या वाहनांना नारपोली हद्दीतील अंजुर दिवेगाव, लोढा धाम, माणकोली येथे प्रवेश बंद असेल. ही वाहने अंजुरफाटा, भिवंडी बाह्यवळण रस्त्याने पुढे जातील
कल्याण-अंबरनाथकडून येणारी वाहने: कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, नवी मुंबईहून माणकोली पुलाकडे जाणाऱ्या वाहनांना पत्रीपूल, टाटा नाका, सुयोग हॉटेल, डीएनएस बँक सोनारपाडा, मानपाडा चौक, घरडा सर्कल येथे प्रवेश बंद असेल. ही वाहने दुर्गाडी आणि गांधारे पुलावरून इच्छित स्थळी जातील
ठाकुर्ली-डोंबिवलीकडून येणारी वाहने: ठाकुर्ली पूल आणि कोपर पुलावरून येणाऱ्या वाहनांना या पुलांवर प्रवेश बंद असेल. या वाहनांना दुर्गाडी पूल आणि गांधारे पुलाचा वापर करावा लागेल
डोंबिवलीतून मोठागावकडे जाणारी वाहने: रेतीबंदर रेल्वे फाटकमार्गे मोठागाव माणकोलीकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद असेल. त्यांनी पत्रीपूल आणि दुर्गाडी चौकातून पुढे जावे
हे बदल गणेशोत्सवादरम्यान होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी घेण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी या नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.