digital products downloads

डोंबिवलीत ‘एक्सक्युज मी’ म्हटल्यावरून वाद: मराठीत बोला म्हणत दोन महिलांना बेदम मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल; VIDEO व्हायरल – Mumbai News

डोंबिवलीत ‘एक्सक्युज मी’ म्हटल्यावरून वाद:  मराठीत बोला म्हणत दोन महिलांना बेदम मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल; VIDEO व्हायरल – Mumbai News


मराठी न बोलल्याने दोन महिलांना बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मुंबईला लागून असलेल्या डोंबिवलीत ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार, ती तिच्या सहकाऱ्यासोबत स्कूटीवर येत होती. तिने रस्त्यावर उ

.

यासंबंधीच्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिमेतील जुनी डोंबिवली येथील गणेश श्रद्धा बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या पूनम गुप्ता काल रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मैत्रिणीसोबत स्कूटीवरून घराकडे निघाल्या होत्या. तेव्हा बिल्डिंगच्या बाहेर रस्त्यावर काही लोक उभे होते. त्यांना बाजूला होण्यासाठी “Excuse me” असे इंग्रजीत म्हटले. पूनम गुप्ता यांनी एक्सक्यूज मी म्हणताच, एका तरुणाने मागे फिरून मराठी बोला असे म्हणत त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.

त्या तरुणाने दोन्ही महिलांकडे मराठीतून बोलण्याचा आग्रह धरला. त्यावेळी दुचाकीवर एक महिला दुचाकी चालवित होती. दुसरी महिला तिच्या पाठीमागे दुचाकीवर एक नऊ महिन्याचे बाळ घेऊन बसली होती. मराठीतून बोलत नाही म्हटल्यावर तरुणाने दुचाकीच्या पाठीमागे बसलेल्या महिलेचा हात पिरगळून, तिला मराठी कशी बोलत नाहीस, असा प्रश्न केला.

महिलांनी मराठी बोलण्यास नकार दिल्यानंतर रितेश बाबासाहेब ढबाले त्यांची पत्नी आणि बाबासाहेब गोविंद ढबाले व त्यांच्या काही साथीदारांनी “इंग्रजी नाही, तर मराठीत बोला” असे म्हणत पूनम आणि त्यांच्या मैत्रिणीला बेदम मारहाण केली. हा प्रकार सुरू असतानाच पूनम यांचे पती आणि दुसरी मैत्रीण तेथे मदतीला आले. मात्र त्यांनाही मारहाण करण्यात आली. या मारहाणीदरम्यान, एका व्यक्तीच्या डोक्याला इजा झाली. या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मारहाणीत एका महिलेच्या कडेवर असणाऱ्या बाळाची आबाळ झाली. हा प्रकार सोसायटीच्या प्रवेशद्वारात सुरू होता.

एक्सक्यूज मी हा नेहमीच्या वापरातील शब्द आहे. त्यामुळे तो बोलला म्हणजे मराठी भाषेचा अपमान होत नाही. असे असताना किरकोळ कारण पुढे करून आम्हा दोघींना सात जणांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी आम्ही विष्णुनगर पोलिस ठाण्यात सात जणांविरोधात तक्रार केली आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आहे, असे तक्रारदार महिलेने सांगितले.

तिघांवर गुन्हा दाखल

दरम्यान, या प्रकरणी तीन आरोपींविरोधात विष्णूनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. तिघांवर अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद घेत तपास सुरू केला आहे. या वादामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी मराठी विरुद्ध हिंदी असा वाद उफाळल्याचे पाहायला मिळत होते. त्यातच आता इंग्रजी बोलण्यावरून देखील वाद निर्माण झाल्याने हा वाद चर्चेचा विषय ठरला आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp