digital products downloads

‘…तर एखाद्या आमदाराला कापून टाका’, बच्चू कडूंचा जाहीर सभेत शेतकऱ्यांना सल्ला

‘…तर एखाद्या आमदाराला कापून टाका’, बच्चू कडूंचा जाहीर सभेत शेतकऱ्यांना सल्ला

Bachchu Kadu On Farmer Right: बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात काल राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू, महादेव जानकर आणि दीपक केदार यांच्या प्रमुख सहभागाने चर्चा झाली. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आयोजित ही परिषद शेतकऱ्यांच्या दुःखाची आणि वेदनेची सभा ठरली. यावेळी बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना उद्देशून खळबळजनक विधान केलंय. ज्याची राज्यभरात चर्चा होतेय. काय म्हणाले बच्चू कडू? सविस्तर जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

शेतकऱ्यांना काहीच येत नसल्यासारखे वाटते, पण आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका, असे बच्चू कडू म्हणाले.  तुम्ही विचारांची लढाई सोडून जाती-पातीच्या भांडणात अडकला आहात, ज्यामुळे शेतकरी मागे पडला आहात. सोयाबीनसारख्या पिकांना कमी किमतीत विक्रीस भाग पाडले जात असताना शेतकऱ्यांनी बांगड्या भराव्यात, असे बच्चू कडू म्हणाले. मोर्चे, मेळावे आणि प्रचार सभांना गर्दी असते, पण शेतकरी परिषदांना कमी लोकप्रतिनिधित्व मिळते, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तलवारने सुरू केलेली लढाई लेखणीने संपवली, तर शरद जोशींनी अर्धा लाख पगाराची नोकरी सोडून शेतकऱ्यांसाठी झटले, असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांच्या एकजुटीची आठवण करून दिली.

सरकारची धोरणांमुळे शेतकऱ्यांची लूट

परिषदेत कडू यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. या सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना भगवा, हिरवा, निळा रंगात विभागले आणि त्यामुळे शेतकरी विभागला गेला. शरद जोशी, बाबासाहेब आंबेडकर आणि स्वतः कडू यांना शेतकऱ्यांनीच पाडले, कारण ते जातीच्या राजकारणात गुंतले नाहीत, असे कडू म्हणाले. लोकसभा निवडणुकीत कापूस किंवा सोयाबीनच्या भावाची मागणी केली नाही, फक्त जाती पाहिली गेली. सर्व जाती एकाच मातीवर जगतात, शेतकरी प्रत्येक जातीत आढळतात, तरी सर्वाधिक कष्ट त्यांचे आणि लूट त्यांचीच होतेय. सरकार हे ‘डुक्करासारखे’ आहे – ते परवडत नाही, शहरातील आमदार परवडतात जे हप्ते वसूल करून मस्त असतात, असेही ते पुढे म्हणाले.

आंदोलनाची गरज 

तुमच्या बैलाला तरी लाथ मारता, पण आमदारांना नाही. शेतमालाला चांगला भाव मिळाला तर आम्ही लोकांना रोजगार देऊ शकतो. आरक्षणाने एखादा कुटुंब किंवा समाज सुखी होऊ शकतो, पण योग्य भावाने संपूर्ण गाव आनंदी होईल, असे कडू म्हणाले. संभाजी महाराजांना औरंगजेबाने मारले नाही, तर सासऱ्यांनीच धोका दिला – असाच जाती-धर्माच्या विभागणीत शेतकरी एकत्र येत नाहीत, अन्यथा सरकार एका दिवशी सुधारेल. मोदी सरकारने अमेरिकेतून 100 लाख गाठी कापूस मागवला, पण मीडियात बातमी नाही, कारण मीडियाचे अर्धे मालक भाजपचे आहेत. मातीची किंमत वाढली नाही तर जग सुधरत नाही; गाव गरीब राहिले तरच शहर श्रीमंत होईल, असे त्यांनी सांगितले.

नागपूर मोर्चाची घोषणा 

परिषदेच्या कडू यांनी 28 ऑक्टोबरला नागपूर मोर्च्याची घोषणा केली. पंजाबच्या शेतकऱ्यांनी 13 महिने काळे कायदे रद्द करायला लावले, तर आम्ही ‘बायकोची आठवण’ येऊन घरी परततो. शेतात जितकी मेहनत करता, तिच्या एका टक्क्याने आंदोलनात भाग घ्या, मग तुमचे हक्क मिळतील. जेव्हा सर्व रंगांचे झेंडे घेऊन शेतकरी लढतील, तेव्हाच सुखाचे दिवस येतील, असे आवाहन बच्चू कडू यांनी केले. 

FAQ

१. बुलढाण्यातील शेतकरी हक्क परिषदेत बच्चू कडू यांनी काय वक्तव्य केले?

बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात आयोजित शेतकरी हक्क परिषदेत बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या हताशेवर संताप व्यक्त केला. त्यांनी म्हटले की, शेतकऱ्याला काहीच येत नसल्यासारखे वाटत असेल, तर आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला ‘कापून टाकण्याचा’ (सुधारण्याचा) प्रयत्न करा. त्यांनी शेतकऱ्यांना जाती-पातीच्या भांडणात न अडकता विचारांच्या लढाईत सहभागी होण्याचे आवाहन केले, कारण सरकारने शेतकऱ्यांना रंग आणि जातींमध्ये विभागून कमजोर केले आहे.

२. परिषदेत शेतकऱ्यांच्या समस्यांवर काय चर्चा झाली?

परिषदेत बच्चू कडू, महादेव जानकर आणि दीपक केदार यांनी शेतकऱ्यांच्या अधोगतीसाठी सरकारला जबाबदार ठरवले. कडू यांनी सांगितले की, शेतमालाला कमी भाव मिळत असल्याने शेतकरी हतबल आहे. सोयाबीनला योग्य किंमत न मिळाल्यास शेतकऱ्यांनी ‘बांगड्या भराव्यात’ (प्रतिरोध करावा). सरकार शेतकऱ्यांना रंगात आणि जातीत विभागते, ज्यामुळे एकजूट होत नाही. त्यांनी शरद जोशी आणि बाबासाहेब आंबेडकरांचे दाखले देत शेतकऱ्यांनी निवडणुकीत कापूस, सोयाबीनच्या भावाची मागणी न करता जाती पाहिल्याची टीका केली.

३. परिषदेतून शेतकऱ्यांना कोणता संदेश देण्यात आला?

बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना एकजुटीचे आणि आंदोलनाचे महत्त्व पटवले. त्यांनी २८ ऑक्टोबरला नागपूरला मोर्च्याची घोषणा केली. पंजाबच्या शेतकऱ्यांनी १३ महिन्यांच्या आंदोलनाने काळे कायदे रद्द करायला लावले, तर आपण शेतात जितकी मेहनत करतो, तितक्या एक टक्का मेहनतीने आंदोलनात सहभागी व्हा, असे सांगितले. शेतमालाला योग्य भाव मिळाला तर संपूर्ण गाव सुखी होऊ शकतो, असे म्हणत त्यांनी सर्व रंगांचे झेंडे एकत्र घेऊन लढण्याचा संदेश दिला.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp