
Ganeshotsav Visarjan Pune Police Warning: देशभरात अनंत चतुर्थी उत्साह दिसत आहे. लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी हजारो भक्त मुंबई आणि पुण्याच्या रस्त्यांवर उतरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईबरोबरच पुण्यातील मोठ्या मंडळांचे आणि मानाचे गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झाले आहेत. गणपती बाप्पाला निरोप देण्याची जोरदार तयारी आणि उत्साह दिसत असतानाच दुसरीकडे पुणे पोलिसांनी जारी केलेला एक इशारा चर्चेत आहे. गुरुवारी 4 सप्टेंबर ते सोमवार 15 सप्टेंबर या कालावधीत गणपती मूर्ती विसर्जनाचे फोटो किंवा व्हिडिओ चित्रित करणे आणि प्रसारित करण्यावर निर्बंध असल्याचे आदेश पुणे पोलिसांनी जारी केला आहे.
नेमका काय आहे निर्णय?
सांप्रदायिक सलोखा राखण्यासाठी आणि उत्सवादरम्यान संभाव्य अशांतता टाळण्यासाठी हा आदेश जारी करण्यात आला असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही म्हणून हा प्रतिबंधात्मक निर्णय घेण्यात आला आहे. शनिवारी मुख्य विसर्जनाच्या दिवशी, जेव्हा हजारो भाविक शहरात गणेश विसर्जनात सहभागी होण्याची अपेक्षा आहे, त्यापूर्वी हे निर्देश देण्यात आले आहेत. सीआरपीसीची जागा घेणारा नवीन फौजदारी प्रक्रिया संहिता असलेल्या भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) च्या कलम 163 अंतर्गत हा आदेश जारी करण्यात आला आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर भारतातील फौजदारी गुन्ह्यांचे नियमन करणाऱ्या भारतीय न्याय संहिता (BNS) च्या संबंधित कलमांखाली कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पुणे पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.
आदेशात काय म्हटलंय?
“नैसर्गिक जलसाठ्यांमध्ये किंवा कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित केलेल्या गणपती मूर्तींचे चित्रीकरण आणि शेअरिंग केल्याने धार्मिक भावना दुखावू शकतात. यामुळे सार्वजनिक शांतता बिघडू शकते. उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिताच्या (BNS) संबंधित कलमांखाली कारवाई केली जाईल,” असे आदेशात नमूद करण्यात आलं आहे.
आज गणोशोत्सवाची सांगता
भारतातील सर्वात लोकप्रिय सणांपैकी एक असलेल्या गणेशोत्सवाची आज सांगता होत आहे. आज जवळपास सर्वच मोठ्या गणेश मंडळांमधील मूर्तींचं सार्वजनिक जलसाठ्यांमध्ये किंवा घरी पारंपारिक विधींनुसार, विसर्जन केलं जाणार आहे. अनेक कुटुंबांसाठी, विसर्जन हा भक्ती, उत्सव आणि कृतज्ञतेचा दिवस मानला जातो. काही कुटुंबे कौटुंबिक परंपरा पाळत दीड दिवसांचा, पाच दिवसांचा किंवा सात दिवसांचा गणपती आणून त्याचं ठरलेल्या दिवशी विसर्जन करतात, तर बहुतेक जण ते उत्सवाच्या शेवटच्या दिवशी विसर्जन करतात.
FAQ
पुणे पोलिसांनी गणपती विसर्जनासंदर्भात कोणता आदेश जारी केला आहे?
पुणे पोलिसांनी 4 सप्टेंबर 2025 ते 15 सप्टेंबर 2025 या कालावधीत गणपती मूर्तींचे विसर्जनाचे फोटो किंवा व्हिडिओ चित्रीकरण आणि त्यांचे समाजमाध्यमांवर प्रसारण करण्यावर बंदी घालणारा आदेश जारी केला आहे. हा आदेश धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत आणि सार्वजनिक शांतता राखली जावी यासाठी आहे.
हा आदेश कोणत्या कायदेशीर तरतुदींखाली जारी करण्यात आला आहे?
हा आदेश भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) च्या कलम 163 अंतर्गत जारी करण्यात आला आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता (BNS) च्या संबंधित कलमांखाली कायदेशीर कारवाई होईल.
या आदेशामागील कारण काय आहे?
विसर्जनानंतर गणपती मूर्ती अर्धवट पाण्यात तरंगताना किंवा किनाऱ्यावर जमा झालेल्या अवस्थेत दिसू शकतात. अशा मूर्तींचे फोटो किंवा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याने धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात आणि सार्वजनिक शांततेला बाधा येऊ शकते. सांप्रदायिक सलोखा आणि शांतता राखण्यासाठी हा प्रतिबंधात्मक निर्णय घेण्यात आला आहे.
हा आदेश कोणत्या कालावधीत लागू आहे?
हा आदेश 4 सप्टेंबर 2025 रोजी 00:01 वाजल्यापासून 15 सप्टेंबर 2025 रोजी 24:00 वाजेपर्यंत पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात लागू असेल.
आदेशाचे उल्लंघन केल्यास काय कारवाई होईल?
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 223 अंतर्गत दंडात्मक कारवाई केली जाईल. यामुळे कायदेशीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.