
Kirit Somaiya and Ajit Pawar : मशिदीवरील भोंग्याच्या वाद अजित पवारांच्या दरबारात पोहोचलाय. अजित पवारांनी भोंग्याच्या मुद्द्यावरून एक बैठक देखील घेतली. या बैठकीत अजित पवारांनी मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून सोमय्यांना सुनावलंय. तसंच सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये असा सल्ला देखील अजित पवारांनी किरीट सोमय्यांना दिलाय.
मशिदीवरील भोंग्यावरून पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी भोंग्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. तसंच सुप्रीम कोर्टाच्या नियमांचं पालन न करणा-या मशिदींवरून भोंगे खाली उतरवण्यात येतायत. काही दिवसांपासून पोलिसांकडून मशिदीवरील भोंग्यांवरुन त्रास दिला जात असल्याची तक्रार मुस्लिम संघटनांकडून करण्यात आलीय. त्यामुळे अजित पवारांनी मुस्लीम नेते आणि संघटनांशी या मुद्द्यावर चर्चा केलीय.
मशिदीवरील भोंग्याच्या मुद्यावर अजित पवारांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत अजित पवारांनी मुस्लीम नेते आणि संघटनांशी चर्चा केली. किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये, सोमय्या मशिदीत गेल्यास कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मुस्लीम संघटना, नेत्यांसोबतच्याबैठकीत अजित पवारांनी किरीट सोमय्यांना सुनावल्याची माहिती मिळाली. मुस्लीम नेते आणि संघटना यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर अजित पवारांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारतींसोबत देखील बैठक घेतली.
बैठकीत काय झालं? कोणते आदेश दिले?
अनधिकृत भोंग्याच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आजच्या बैठकीत एक निर्णय घेण्यात आला. बैठकीत पोलीस आयुक्त देवेन भारतींनी उच्च न्यायालयाने घातलेली 46 ते 56 डेसिबल आवाज मर्यादेचं पालन होऊच शकत नाही याचं प्रात्याक्षिक दाखवलं. बैठकीत बसलेल्या लोकांचा आवाज देखील 46 डेसिबल पेक्षा जास्त आहे, याचं प्रात्याक्षिक देवेन भारतींनी दादांना करून दाखवलं. त्यानंतर अजित पवारांनी नियमांचं पालन न करणा-यांवर कारवाईचे निर्देश दिले आहेत. चुकीच्या पद्धतीनं कोणतीही कारवाई न करण्याच्या सूचना देखील अजित पवारांनी दिल्या आहेत.
मशिदींवरील भोंग्यासंदर्भात किरीट सोमय्यांनी अनेक वेळा आंदोलन केलं होतं. तसंच मशिदीवरील भोंगे उतरवण्यात यावेत यासाठी त्यांनी मुंबई पोलिसांकडे अनेकदा तक्रार देखील केलीये. मशिदीवरील भोंग्याविरोधात मनसेनं देखील आक्रमक भूमिका घेतली होती. राज्यभरात मनसैनिकांनी भोंग्याविरोधात आंदोलन केली होती. मात्र, आता किरीट सोमय्यांनी भोंग्याविरोधात मोहीम उघडली आहे. तसंच सुप्रीम कोर्टाच्या नियमांचं पालन न करणा-या मशिदींवरील भोंगे मुंबई पोलिसांकडून खाली उतरवणं सुरू आहे. त्यामुळे राज्यात भोंग्याचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.