digital products downloads

तालिबानी हरकत: दिल्लीत तालिबानी मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला प्रतिनिधींना रोखले

तालिबानी हरकत:  दिल्लीत तालिबानी मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला प्रतिनिधींना रोखले

नवी दिल्ली/देवबंद34 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

अफगाणिस्तानातील तालिबान सरकारचे परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्ताकी हे त्यांच्या भारत भेटीदरम्यान वादात सापडले आहेत. शुक्रवारी महिला पत्रकारांना त्यांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहण्यापासून रोखण्यात आले. विरोधी पक्ष, पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांनी यावर संताप व्यक्त केला.

महिलांवर कडक निर्बंध लादण्यासाठी तालिबान कुप्रसिद्ध आहे. मुत्ताकीच्या पत्रकार परिषदेत एकही महिला पत्रकार दिसली नाही. नंतर पत्रकारांनी सोशल मीडियावर वृत्त दिले की संपूर्ण शरीर झाकणाऱ्या ड्रेस कोडचे पालन करूनही महिला पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आला. लेखिका तस्लिमा नसरीन म्हणाल्या की, तालिबान महिलांचे हक्क नाकारते. कारण ते त्यांना मनुष्य मानत नाहीत. पुरुष पत्रकारांनी परिषदेतून निघून जायला हवे होते.

आमची भूमिका नव्हती- सरकार

भारताचे परराष्ट्र मंत्रालय ः आमची भूमिका नव्हती… भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की मुत्ताकीच्या पत्रकार परिषदेत त्यांची कोणतीही भूमिका नव्हती. मुंबईतील अफगाण काऊन्सल जनरलने निवडक पत्रकारांना आमंत्रित केले होते. अफगाण दूतावासाचा प्रदेश भारत सरकारच्या अधिकारक्षेत्रात येत नाही.

दहशतवादविरोधी फतव्याच्या भूमीतून दीक्षा घेऊन परतलेले तालिबानी नेते

देवबंद दौरा महत्त्वाचा का? प्रथमच तालिबानी नेत्याचा देवबंद विचारसरणीशी थेट संपर्क आला. हे शांतता व अतिरेकीपणा या दोन टोकांचे मिलन दर्शवते. मुत्ताकीने खैबर पख्तूनख्वा येथील हक्कानिया मदरशात शिक्षण घेतले, जिथे मुल्ला उमर आणि जलालुद्दीन हक्कानी यांच्यासह अनेक तालिबानी नेते शिकले. पाकिस्तान दहशतवादाच्या नावाखाली या विचारसरणीला बदनाम करत आहे. या यात्रेदरम्यान काय झाले? मुत्ताकी यांना मोहतमीम (कुलगुरू) कडून मानवता, सामाजिक सुधारणा व आध्यात्मिक शिस्त यासारख्या कुराणातील शिकवणींचे धडे मिळाले. आता ते दारुल उलूम परंपरेनुसार इस्लामिक शिकवणी शिकवू शकतील.

ऐतिहासिक संबंध काय होते? १९९९ मध्ये पाक दहशतवाद्यांनी आयसी-८१४ विमानाचे अपहरण करत कंदाहारला नेले. तिथे तालिबानी सत्ता होती. सरकारने देवबंदच्या मौलाना मदनींमार्फत मुल्ला उमरशी करार केला. तालिबानकडे आता असे मंत्री आहेत, जे दहशतवादविरोधी फतव्यांच्या भूमीतून परतले आहेत आणि त्यांना वैचारिक दीक्षा मिळाली आहे.

विरोधकांनी म्हटले – देशात महिलांंचा अपमान मान्य नाही…

राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधानांच्या घोषणा पोकळ… राहुल म्हणाले महिलांना समान सहभागाचा अधिकार आहे. पंतप्रधानांचे मौन महिला सक्षमीकरणाच्या नाऱ्यांचा पोकळपणा उघड करते. प्रियंका गांधी यांनी पंतप्रधानांनी भारतात महिलांचा अनादर कसा होऊ दिला हे स्पष्ट करण्याची मागणी केली. महुआ मोइत्रा, प्रियंका चतुर्वेदींनीही टीका केली. तालिबानचे स्पष्टीकरण : भेदभाव नाही… तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन म्हणाले की हे अनवधानाने घडले. महिलांविरुद्ध भेदभावाचे कोणतेही धोरण नाही. ही एक तांत्रिक बाब होती. पास मर्यादित होते. काहींना ते मिळाले, तर काहींना नाही. अनेक पुरुषांनाही ब्रीफिंगमधून वगळण्यात आले. मुत्ताकी काबूलमधील त्यांच्या कार्यालयात महिला पत्रकारांना भेटत आहेत. अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री मुत्ताकी यांनी शनिवारी उत्तर प्रदेशातील सहारनपूरच्या दारुल उलूम देवबंदला भेट दिली, जी २००७ मध्ये दहशतवादाविरुद्ध पहिला फतवा जारी करणाऱ्या इस्लामिक शिक्षण संस्थांपैकी एक आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp