
Maharashtra Weather News : हवामान विभागानं राज्यात पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा दिला असून, वाऱ्याचा वेग वाढणार असल्या कारणानं पावसाचा मारा आणखी तीव्रतेनं होणार असल्याचा इशारा दिल्यानं नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणासह मध्य महाराष्ट्रात ताशी 40-50 किमी वारे वाहणार असल्यानं मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, मराठवाड्याची पावसाच्या तडाख्यातून इतक्यात सुटका होणार असून या भागात पुन्हा एकता ताशी 30 ते 40 वेगानं वारे वाहून मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मागील 15 दिवसांत पावसाचा अतिरेक
राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली जाते असून, मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, सातारा आणि पुणे घाट माथ्यावर आज ऑरेंज अलर्ट दिला आहे. तिथं कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, संभाजीनगरला यलो अलर्ट देण्यात आला आहे, तर मराठवाडा, विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असल्यानं नागरिक आणि यंत्रणा सतर्क आहेत.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 28, 2025
शनिवारी मध्यरात्रीपासून वाढलेल्या पावसानं मुंबईसह उपनगरांतही चिंतेत भर पटली. सोमवारपर्यंत हे चित्र बदलणार नसून, प्राथमिक अंदाजानुसार राज्यात मंगळवारपासून पावसाचा काही अंशी जोर कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
पावसानं एकाएका जोर का धरला?
सहसा सप्टेंबरच्या अखेरपर्यंत पावसाचा परतीचा प्रवास सुरू होतो. यंदा मात्र तसं काहीच चित्र नसून अगदी मे महिन्यापासून सुरू असणारा हा पाऊस सप्टेंबरच्या अखेरपर्यंत मुक्कामी असल्याचं पाहायला मिळत आहे. बंगालच्या उपसागरात सातत्यानं होणारे बदल, वाऱ्याची दिशा आणि चक्राकार वाऱ्यांची स्थिती यास कारणीभूत ठरत आहे.
सध्या बंगालच्या उपसागरात असणारं कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर आल्यानं महाराष्ट्राच पावसाने जोर धरल्याची बाब प्राथमिक निरिक्षणातून समोर आलं आहे. परिणामस्वरुप मराठवाड्यासह विदर्भातही मुसळधार पावसाची हजेरी आहे. दरम्यान, राज्यात सोमवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून मंगळवारपासून त्याची तीव्रता कमी होईला आणि अखेर ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही भागात परतीच्या पावसाची हजेरी पाहायला मिळेल असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
FAQ
राज्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा का देण्यात आला आहे?
हवामान विभागाने (IMD) वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता वर्तवली असून, उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहणार आहेत. यामुळे मेघगर्जना, विजा आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात ताशी 30-40 किमी वेगाने वारे आणि मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कोणत्या भागांना ऑरेंज आणि यलो अलर्ट देण्यात आले आहेत?
ऑरेंज अलर्ट: मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, सातारा आणि पुणे घाटमाथा.
यलो अलर्ट: कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर; मराठवाडा आणि विदर्भातील सर्व जिल्हे. यामुळे नागरिक आणि प्रशासन सतर्क झाले आहे.
मागील 15 दिवसांत पावसाचा अतिरेक का झाला आहे?
मागील 15 दिवसांत राज्यभर पावसाचा जोर वाढला असून, शनिवारी मध्यरात्रीपासून मुंबई आणि उपनगरांत मुसळधार पावसाने चिंता वाढवली आहे. सोमवारपर्यंत हा जोर कायम राहील, तर मंगळवारपासून काही अंशी कमी होईल, असा अंदाज आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.