digital products downloads

‘तिजोरीच्या चाव्या माझ्याकडेच, निधी फक्त सेना-भाजपलाच; चुकून ठाकरेंचा उमेदवार निवडून आला तर…’, नितेश राणेंचे वादग्रस्त विधान!

‘तिजोरीच्या चाव्या माझ्याकडेच, निधी फक्त सेना-भाजपलाच; चुकून ठाकरेंचा उमेदवार निवडून आला तर…’, नितेश राणेंचे वादग्रस्त विधान!

Nitesh Rane: पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवलीत सतीश सावंत यांनी समर्थकांसह भाजपात प्रवेश केलाय. या जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर राणे साहेबांच्या नेतृत्वात महायुतीचे सगळेच उमेदवार जर आम्ही जिंकून दिले, तर आमच्या प्रत्येक गावाचा विकास होऊ शकतो असा जनतेला विश्वास बसल्याचे नितेश राणेंनी म्हटले. दरम्यान त्यांनी निधी वाटपावरुन एक वादग्रस्त विधान केलंय. याबद्दल जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

महायुतीचे सगळे उमेदवार ठासून येणार 

या जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर राणे साहेबांच्या नेतृत्वात महायुतीचे सगळेच उमेदवार जर आम्ही जिंकून दिले, तर आमच्या प्रत्येक गावाचा विकास होऊ शकतो असा जनतेला विश्वास बसला आहे.​म्हणूनच ठाकरे सेनेचे नेते सोडा, त्यांना उमेदवार पण साधे हक्काचे मिळत नाहीयेत, असे नितेश राणे म्हणाले. त्यांना एवढ्या वर्षांनी जनतेने सत्ता देऊन पाहिली. 2014 पासून ते 2024 पर्यंत ठाकरे सेनेकडेच ही सगळी सत्ता होती, खासदार होते, आमदार होते. काय केलं आमच्या जिल्ह्यासाठी? कुठला विकास आणला? किती मुलांना रोजगार दिला? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या सगळ्या गोष्टी आता जनतेला कळून चुकल असल्यामुळे, जो काही विजयाचा झंझावात राणे साहेबांच्या नेतृत्वात सुरू झालेला आहे. महायुतीचे सगळे उमेदवार घासून नाही ठासून निवडून येतील असा विश्वास नितेश राणेंनी व्यक्त केला.

एआर रहेमानवर टीका 

​एआर रहेमान कपिल शर्मा शोमध्ये बोलावल्यावरुन नितेश राणेंनी टीका केलीय.  असंच कोणी पाकिस्तानच्या विरोधात, कराचीच्या विरोधात, बांगलादेशच्या विरोधात कोणी वक्तव्य केलं असतं तर त्या त्या इस्लामिक राष्ट्राने त्यांना जिवंत तरी ठेवलं असतं का? की कापून बाहेर फेकलं असतं? ​मग आम्ही अशा लोकांना आपण ‘कपिल शर्मा’ सारख्या शोला का बोलवतोय? जे देशविरोधी वक्तव्य करतात, भूमिका घेतात. म्हणून अशा पद्धतीने आमच्या देशाचा अपमान करणारे, हिंदू समाजाचा अपमान करणाऱ्या लोकांना कुठल्याच व्यासपीठावर बोलवू नये, बहिष्कार टाकला पाहिजे. जेणेकरून भविष्यामध्ये आमच्या देशाच्या विरोधात, हिंदू समाजाच्या, हिंदू राष्ट्राच्या विरोधात कोणीही चुकीचं बोलण्याची हिम्मत करणार नाही, एवढी भीती निर्माण केली पाहिजे, असे नितेश राणे म्हणाले. 

ठाकरेंच्या शिवसेनेला सिंधुदुर्गात जोरदार धक्का

ठाकरे शिवसेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र केलाय. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसलाय. पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवलीत सतीश सावंत यांनी समर्थकांसह भाजपात प्रवेश केलाय. भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या विरोधात 2019 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून सतीश सावंत यांनी निवडणूक लढवली होती .एकेकाळी नारायण राणेंचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेल्या सतीश सावंत यांनी नितेश राणेंवर आरोप करत राणेंची साथ सोडली होती. आज सर्व मतभेद विसरून सतीश सावंत यांनी घेतला भाजपचा झेंडा हाती घेतलाय. 

पालकमंत्री नितेश राणे यांचे वादग्रस्त वक्तव्य

विकासाचा निधी मीच देणार कारण तिजोरीच्या चाव्या पालकमंत्री म्हणून माझ्या ताब्यात आहेत, असे विधान भाजप मंत्री नितेश राणेंनी केलंय. निधी कमळ आणि धनुष्यबाणालाच मिळणार, असेही ते म्हणाले. ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार कदाचित निवडून आलाच तर दिलेला निधी पण परत मागे घेणार. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या,असे आवाहन त्यांनी केले. महायुतीच्या प्रचार सभेच्या निमित्ताने आयोजित खळा बैठकीत नितेश राणे यांचे वादग्रस्त वक्तव्य पाहायला मिळाले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp