digital products downloads

तुकडेबंदी कायद्यातील सुधारणांमुळे जुन्या मालमत्तांचे व्यवहार सुटणार: अमरावतीत जनता दरबारात नागरिकांना दिली माहिती – Amravati News

तुकडेबंदी कायद्यातील सुधारणांमुळे जुन्या मालमत्तांचे व्यवहार सुटणार:  अमरावतीत जनता दरबारात नागरिकांना दिली माहिती – Amravati News



तुकडेबंदी अधिनियमातील सुधारणांमुळे जिल्ह्यातील अनेक मालमत्तांच्या खरेदी-विक्री व्यवहारातील अडचणी दूर होणार आहेत. राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या अधिनियमात सुधारणा केल्या आहेत. या सुधारणांमुळे गेल्या ८० वर्षांतील मालमत्तांचे व्यवहार नियमानुकूल केले जाणार आहेत. या सुधारणांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी अमरावतीत जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या पुढाकाराने आयोजित या जनता दरबारात महसूल उपजिल्हाधिकारी विवेक सोळंके, एसडीओ अनिल भटकर, मुद्रांक जिल्हाधिकारी अनिल औतकर आणि तहसीलदार विजय लोखंडे उपस्थित होते. या अधिकाऱ्यांनी उपस्थित नागरिकांना अधिनियमातील तरतुदी समजावून सांगितल्या. या सुधारणांमुळे सन १९६५ ते २०२४ या काळातील सर्व मालमत्तांचे व्यवहार नियमानुकूल केले जातील. पालकमंत्री बावनकुळे यांच्या सूचनेनुसार, सध्या सर्व विभागांच्या प्रमुखांमार्फत ठिकठिकाणी जनता दरबार भरवले जात आहेत. जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी जनसंवाद आणि जनता दरबार आयोजित करण्याच्या या श्रृंखलेतीलच हा एक भाग होता. या कार्यक्रमादरम्यान अमरावती शहराचे नवनिर्वाचित महापौर श्रीचंद तेजवानी यांच्यासह इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. उपजिल्हाधिकारी विवेक जाधव यांनी अधिसुचनेची पार्श्वभूमी आणि शासनाचा उद्देश याबाबत माहिती दिली. महापौर तेजवानी यांनी शासनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत जास्तीत जास्त जनतेने या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी योद्धानायक अनंत हरणे, लक्ष्मीनारायण शर्मा, ॲड. रिझवानोद्दीन, निलेश वडे, अशरफ पटेल, मनोरमा सर्वटकर, नितीन मिराणी, ॲड. कदम यांच्यासह अनेक नागरिकांनी आपल्या समस्या आणि शंका मांडल्या. मुद्रांक जिल्हाधिकारी अनिल औतकर यांनी सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांचे समाधान केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका भेंडे यांनी केले, तर सुनील वाडेवाले, सह दुय्यम निबंधक तथा विवाह अधिकारी, अमरावती यांनी आभार मानले. यावेळी सुधीर मालोकर, विलास राठोड, प्रशांत भगत, दीपक मुकपल्ली, राजकुमार आडोळे, अभिजित विधाते, जितू कांबळे, शिवम जुमळे, विजय किरपाने, विनोद शिरभाते, विजय येवले, अमोल गुल्हाने, संजयआप्पा मुंजाळे, ॲड. पातुर्डे, अ. कलीम अ. अजीज, निखिल गावंडे, अजय खुळे, विनोद साऊरकर, राकेश रहेजा आदी मान्यवर उपस्थित होते.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp