
Manoj Jarange Patil on Raj Thackeray : महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजतोय. मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करत आहे. आज या आंदोलनाचा तिसरा दिवस असून राज्यभरातून लाखो मराठा आंदोलकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे मुंबईत एक भगव वादळ दिसतंय. दरम्यान या आंदोलनावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरेंवर पलटवार केला आहे. (manoj jarange patil on raj thackeray Your Nashik in laws Raj Thackeray devendra At Fadnavi house maharashtra politics marathi news )
मनोज जरांगे पाटील काय म्हणालेत?
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, राज्यातल्या समाजाचं म्हणणं आहे की, ते दोघे भाऊ चांगले आहेत. ब्रँड चांगला आहे. पण, हा विनाकारण मराठ्यांच्या प्रश्नांमध्ये पडतो. त्याला आम्ही कधी विचारले का तुला 11 ते 13 आमदार निवडून दिले आणि ते पळून गेले? त्यानंतर तू आमच्या मराठवाड्यात केव्हा आला? आम्ही तुला विचारले का तू काल पुण्यात केव्हा आला? तुला विचारले का तुझी नाशिकची सासरवाडी आहे तू 50 वेळा नाशिकला का येतो? आम्ही विचारलं का? एक लोकसभेला फडणवीसने तुझा गेम केला. त्यानंतर विधानसभेला तुझं पोरगं त्याने पाडलं. तरी तू त्याची री ओढतो. राज ठाकरे म्हणजे मानाला भुकालेलं पोरगं आहे. त्याच्या घरी फडणवीस चहा पिऊन गेला सगळा पक्ष बरबाद झाला तरी त्याला चालतं. आमच्या खेड्यात याला कुचक्या कानाचं म्हणतात, या शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरेंवर पलटवार केला आहे.
राज ठाकरे मराठा आंदोलनावर काय म्हणाले होते?
राज ठाकरे शनिवारी ठाण्यात असताना त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना मराठा आरक्षणाबद्दल विचारण्यात आले. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की, एकनाथ शिंदे आल्यावर त्यांनाच याबद्दल विचारा असं सांगितलं. “या सगळ्या गोष्टींची उत्तरं एकनाथ शिंदे देऊ शकतात. ते येतील तेव्हा त्यांना विचारा. सर्वांना सर्व गोष्टी माहिती आहे. मागच्या वेळी तिकडे गेले होते, नवी मुंबईला जाऊन प्रश्न सोडवला असताना ते परत का आले आहेत?,” या शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली होती.
FAQ
1. मराठा आरक्षण आंदोलन पुन्हा का सुरू झाले आहे?
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. सध्या हे आंदोलन तिसऱ्या दिवशी आहे, आणि राज्यभरातून लाखो मराठा आंदोलकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत.
2. मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर काय टीका केली?
मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार करताना म्हटले की, राज ठाकरे बिनाकारण मराठ्यांच्या प्रश्नात पडतात. त्यांनी राज ठाकरे यांना मराठवाड्यात येण्याबाबत, पुणे आणि नाशिकला वारंवार भेटी देण्याबाबत प्रश्न विचारले. तसेच, फडणवीस यांनी ठाकरे यांचा पक्ष कमजोर केला तरी ते त्यांच्याशी जवळीक ठेवतात, असा आरोप केला. जरांगे पाटील यांनी राज ठाकरे यांना “कुचक्या कानाचं” आणि “मानाला भुकालेलं पोरगं” असे संबोधले.
3. राज ठाकरे यांनी मराठा आंदोलनाबाबत काय म्हटले?
शनिवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यास सांगितले. ते म्हणाले, “या सगळ्या गयति एकनाथ शिंदे देऊ शकतात. ते येतील तेव्हा त्यांना विचारा. मागच्या वेळी नवी मुंबईला जाऊन प्रश्न सोडवला असताना ते परत का आले आहेत?”
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.