
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकरवर जालना पोलिसांकडून तडीपारची कारवाई करण्यात आली होती. यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच निशाणा साधला आहे. एकीकडून सुरेश धस आणि देवेंद्र फडणवीस सांगता
.
माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, आमच्या सरळ स्वभावाचा फायदा तुम्ही उचलायचा नाही. तुम्ही अंतरवालीतील आंदोलकांना जर नोटीस देणार असाल, तुम्ही त्यांच्या पाठीमागे असे लागणार असेल तर मी सोडणार नाही फडणवीस साहेब. तुम्ही जर मराठ्यांना वेठीस धरायचे काम केले तर, तुमचा कार्यक्रम लावायला मला वेळ लागणार नाही. प्रामाणिक आंदोलकांना तुम्ही विकत घेऊ शकत नाही.
पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, त्यांच्यावर तुम्ही प्रेशर आणू शकत नाही. आमची अशी इच्छा होती की, मराठ्यांनी सांगावे आणि फडणवीस यांनी करावे, अशी आमची भोळीभाबडी इच्छा होती. बेमानी आणि गद्दारी हा शब्दाचा शिक्का तुझ्यावर पडू देऊ नको, आम्ही भोळे लोक आहोत, त्यामुळे सर्व हाताने मदत केली. तू रंडकुंडीला आला होता, तुला ही गादी कधीच मिळू शकत नव्हती. या राज्यात मराठ्यांशिवाय पान हालू शकत नाही. तुझा भागले म्हणून जर तू उलटणार असला, हे तुझ्यासाठी घातक असणार आहे, देवेंद्र फडणवीसांनी चूक सुधारावी, त्यांनी दिलेल्या नोटीसा मागे घ्याव्यात. आम्ही देवेंद्र फडणवीसला सन्मानाची वागणूक द्यायला तयार आहोत. नाहीतर पुढच्या काळात सन्मान हा शब्द डोक्यातून काढून टाकायचा, असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
मनोज जरांगे यांच्या मेहुण्यावर तडीपारची कारवाई
मनोज जरांगे यांच्या मेहुण्यावर जालना पोलिसांनी तडीपारची कारवाई केली आहे. यावर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, आपण स्पष्ट सांगितले आहे. तुमचे बाकीचे काय माहिती नाही, आपण त्यात पडतही नाही. पण मराठा आंदोलक म्हणून जर तुम्ही त्यांना नोटीसा देणार असला, हे तुमच्यासाठी घातक आहे. बाकीचे तुमचे काही असेल तर मला देणेघेणे नाही. तुम्ही आंदोलक म्हणून त्यांना नोटीस दिल्यात हे ध्यानात ठेवा, असे मनोज जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले, सरकारने माझे तोंड बंद करण्यासाठी मुद्दाम माझ्या पाहुण्यारावळ्याचं नाव तडीपारीच्या यादीत घुसवले असावे. हे 100 टक्के देवेंद्र फडणवीसांचे षडयंत्र आहे. देवेंद्र फडणवीसला माहीत नाही की, मी समाजापुढे आई-बापाला सुद्धा जवळ केले नाही. समाजासाठी आई बापाला सुद्धा दूर केले तर पाहुणेरावळ्याला जवळसुद्धा उभा राहू देणार नाही. महाराष्ट्रातील सहा कोटी मराठे माझे पाहुणे आहेत. ही देवेंद्र फडणवीसांची नवी चाणक्यनीती आहे का? तुम्हाला ही सत्ता मराठ्यांनी दिली आहे. त्यामुळे सांभाळून राहा.
माझ्यासाठी कुटुंब महत्वाचे नाही. मी कुटुंब खाली उतरवले अंतरवालीच्या व्यासपीठावरून. आई बापाला सरळ सांगितले पोरग घरी आल्यावर, मग काय वाघोलीचे माझे पाहुणे आहेत का? अमरावतीच्या महिला तडीपार केलेल्या, मी जोपर्यंत आंदोलनात आहे तोपर्यंत मराठा म्हणून आहे. चुकीचे काम केले तर माझ्या बापावर जरी केस झाली तरी सोडणार नाही. पाहुण्यांचा तर विषय संपला, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.