
ST Bus Live Location App: आपली एसटी कुठपर्यंत पोहोचली हे प्रवाशांना आता अॅपच्या माध्यमातून समजणार आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) एक अॅप तयार करण्यात आलं असून लालपरीचे लोकेशन समजू शकणार आहे. एसटी तिकीटावर असलेल्या क्रमांकाच्या माध्यमातून बस स्टॅन्डवर येण्याची अचूक वेळ समजणार आहे. 15 ऑगस्टला हे अॅप प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. सध्या एसटीच्या 14 हजार 500 बसमध्ये जीपीएस लोकेशन यंत्र बसवण्यात येणार आहे.
राज्यभरात सध्या 50 हजार मार्गावर एसटीच्या सुमारे सव्वालाख फेऱ्या होतात. लाखो प्रवासी एसटीतून प्रवास करतात. गावखेड्यात एसटी जिवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. ज्या भागांमध्ये रेल्वे पोहोचत नाही तिथे एसटी पोहोचते. अनेकजण लांब पल्ल्यांचा प्रवास असेल एसटीचे आगाऊ आरक्षण करुन तिकीट बुक करतात. पण अनेकदा ट्रॅफिकमध्ये अडकून पडल्यामुळं एसटीला उशिरा आली तर प्रवाशांना ताटकळत उभं राहावं लागतं. पण आता प्रवाशांची ही समस्या कायमची मिटणार आहे.
मधल्या थांब्यावर एसटी नेमकी कधी येणार याची माहिती मिळत नसल्याने तासनतास ताटकळत राहावे लागते. यासाठी महामंडळाने तयार केलेल्या अॅपच्या मदतीने बसचे थांबे आणि त्यांच्या निवडलेल्या स्थानकामध्ये ती येण्याचा अपेक्षित वेळ समजणार आहे. यासाठी बसमध्ये जीपीएस यंत्रणा बसवण्याचे काम सुरू आहे. सध्या 12,000 बसमध्ये ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित सर्व बसमध्ये जीपीएस बसवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना 15 टक्के सूट
महामंडळाच्या लांब व मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये 15 टक्के सूट मिळणार आहे. ही सवलत 1 जुलैपासून लागू होणार असून, 150 कि.मी. पेक्षा जास्त अंतराचा प्रवास करणाऱ्या आणि सवलतधारक प्रवासी वगळून इतर प्रवाशांना ही दिली जाणार आहे. ही योजना दिवाळी व उन्हाळी सुटीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे.
एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या योजनेची घोषणा केली होती. त्यानुसार आता ती लागू करण्यात येत आहे. ही योजना साधी लालपरी, ई-शिवाई आणि शिवनेरी, सेमी लक्झरी अशा सर्व प्रकारच्या बससाठी लागू असणार आहे, तसेच ती पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठीच लागू राहणार आहे. आषाढी एकादशीला व गणपती उत्सवासाठी आरक्षण करणाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. जादा बससाठी ही सवलत लागू असणार नाही.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.