
विशाल धनगर झी 24 तास : एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातला आरोप-प्रत्यारोपाचा सामना सुरूच आहे. हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरून एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांवर आरोप केले होते. तसंच प्रफुल्ल लोढा आणि गिरीश महाजनांचे राजकीय संबंध असल्याचा आरोपही खडसेंनी केला होता. दरम्यान यानंतर गिरीश महाजनांनी देखील एक फोटो शेअर करत खडसेंवर पलटवार केलाय. पाहुयात यासंदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजनांमधलं हनी ट्रॅपवरून सुरू झालेलं राजकीय द्वंद थांबण्याचं नावच घेत नाही आहे. प्रफुल लोढा आणि एकनाथ खडसेंचा एक फोटो शेअर करत गिरीश महाजनांनी पलटवार केलाआहे. एकनाथ खडसेंनी प्रफुल्ल लोढा आणि गिरीश महाजनांचे संबंध असल्याचा आरोप केला होता. दरम्यान यानंतर गिरीश महाजनांनी देखील एक फोटो ट्विट करत एकनाथ खडसेंना काही सवाल केले आहेत.
गिरीश महाजन यांनी शेअर केलेल्या फोटोनंतर एकनाथ खडसेंनी प्रत्युत्तर दिलं. प्रफुल लोढासोबत माझे फोटो असू शकतात. मी नाकारत नाही अशी प्रतिक्रिया महाजनांच्या आरोपांवर एकनाथ खडसेंनी दिली आहे. दरम्यान हे प्रकरण फोटोचं नसून त्यांच्याविरोधात लोढाकडे जे पुरावे आहेत. त्यासाठी त्यांची धडपड सुरू असल्याचा
आरोप एकनाथ खडसेंकडून करण्यात आला.
एकनाथ खडसे… तुमच्या या “गुलाबी गप्पा” कोणासोबत रंगल्या आहेत? ये रिश्ता क्या कहलाता है? तुमचे हे षडयंत्र जनतेसमोर उघड होतंय…
हाच तो प्रफुल्ल लोढा ज्याला तुम्ही दारूडा बोलला होतात ?
हाच तोच प्रफुल्ल लोढा ज्याने तुमच्यावर स्वतःच्या मुलाच्या खुनाचा आरोप केलेला आहे…२०१९ ते… pic.twitter.com/kEVXjsOYcq
— Girish Mahajan (@girishdmahajan) July 24, 2025
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातले आरोप-प्रत्यारोप हे वैयक्तीक पातळीवर येऊन पोहोचले आहेत. गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंचा मुलगा निखील खडसेंच्या मृत्यू प्रकरणावरच प्रश्नचिन्ह निर्माण करत प्रफुल लोढाकडे बोट केलं. दरम्यान महाजन यांनी केलेल्या दाव्यानंतर एकनाथ खडसेंनी देखील मृत्यू प्रकरणाची
चौकशी करा असं थेट आव्हान गिरीश महाजनांना दिलं आहे.
कधीकाळचे जवळचे सहकारी असणारे गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे पक्के राजकीय वैरी बनले आहेत. हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा सामना सुरू आहे. एकनाथ खडसेंनी केलेल्या आरोपांनंतर आता गिरीश महाजनांकडून देखील पलटवार करण्यात आलेला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.