
लंडनवरुन मुंबईला प्रवासी विमान घेऊन जाणारे व्हर्जिन अटलांटिक विमान (व्हीएस३५८) मध्ये एका प्रवाशाच्या वैद्यकीय आणीबाणीमुळे अचानक तुर्कीतील दियाबाकीर विमानतळावर इमर्जन्सी अवघडरित्या लँडिग करावी लागली. मात्र, दियाबाकीर विमानतळ हे लष्करी विमानतळ आकाराने
.
त्यानंतर वेगवान हालचाली करत विविध यंत्रणांशी संपर्क करत प्रवाशांना दिलासा देत त्यांना मुंबईला परतण्यासाठी तांत्रिक अडचणी दूर करून विमान उपलब्ध झाल्याने प्रवाशांना तातडीने मायदेशी येण्यासाठी दिलासा मिळाला आहे.
नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दियाबाकीर विमानतळावर अडकलेले प्रवासी, व्हर्जिन अटलांटिक एअरलाइन्स आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयातील अधिकारी यांच्याशी समन्वय साधण्यासाठी हवाई मंत्रालय मधील एक विशेष पथक नियुक्त केले. तसेच चांगल्या समन्वयासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची तसेच तुर्की मधील भारतीय राजदूताची देखील मदत घेतली. त्यामुळे एकत्रित प्रयत्नातून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र मुख्यमंत्री कार्यालय यांनी देखील मोहोळ यांच्याशी चर्चा केली.
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या विनंतीनुसार, प्रवाशांना सँडविच, फळे व अल्पोपहार देण्यात आले, गर्भवती महिलांची विशेष काळजी घेतली, लहान मुलांना आवश्यक साधने उपलब्ध केली, वैद्यकीय सेवा उपलब्ध केली. व्हर्जिन अटलांटिकने लँडिग गियरची समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला, परंतु अपयश आले.
संबंधित एअरलाइन्सने लंडनहून तुर्कीच्या दिशेने नवीन प्रवासी वाहतूक विमान पाठवले, परंतु तुर्की सरकार व लष्कराने सदर विमानास लँडिंग परवानगी नाकारली. त्यामुळे सदर विमानाला पुन्हा मार्गस्थ व्हावे लागले. सध्या र्व्हिजन अटलांटिक संबंधित विमानातील लँडिंग गियरची समस्या सोडविण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय हवाई खात्याचे पाठपुराव्याने तुर्की सरकारच्या नियमांनुसार प्रवाशांना हॉटेल मध्ये रहाण्याची सोय व नियमित प्रक्रियेसाठी तीन दिवसांचा ट्रान्झिट व्हिसा देण्यात आला.
दरम्यान, मोहोळ यांनी परिस्थितीवर देखरेख ठेवत अधिकारी व एअरलाइन्स यांच्या संर्पकात राहून नियमित घडामोडींची माहिती घेत राहिले आणि तांत्रिक मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहिले. सदर प्रवाशांचे तुर्कीवरुन मुंबईच्या दिशेने व्हर्जिन अटलांटिकच्या विशेष विमानाने उड्डाण झाले असून शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता ते मुंबई विमानतळावर सुखरुप उतरणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.