digital products downloads

‘तेराव्या दिवशी सर्व सांगणार’, अजित पवारांच्या निधनानंतर रोहित पवार करणार मोठा गौप्यस्फोट!

‘तेराव्या दिवशी सर्व सांगणार’, अजित पवारांच्या निधनानंतर रोहित पवार करणार मोठा गौप्यस्फोट!

Rohit Pawar: अजित पवारांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने हृदयविकाराचा झटका येऊन त्यांच्या समर्थकाचा मृत्यू झाला होता. सुदाम बोडके असे त्यांचे नाव असून ते 63 वर्षांचे होते. अजित पवार यांचे कट्टर समर्थक अशी ओळख होती. आधीच अजित पवारांच्या निधनामुळे दु:खात असलेल्या बोडके कुटुंबाला आणखी एक धक्का बसला. दरम्यान शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी बोडके यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दात इशारादेखील दिला.

Add Zee News as a Preferred Source

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील ढकांबे गावचे रहिवासी असलेले सुदाम बोडके यांनी अजित पवार यांच्या निधनाची बातमी ऐकून तीव्र धक्का बसल्याने ते अस्वस्थ झाले होते. दादांची बातमी आपण ऐकली बातमी खरी आहे स्वप्न आहे हे आम्हला कळते नाही. आजपर्यंत आम्ही त्या दु:खात आहोत. त्या विमानातील आणखी जे होते त्याचा परिवार दुःखात होता. अजित पवारांच्या निधनाची बातमी कळली तेव्हा कट्टर कार्यकर्ते अस्वस्थ झाले. नंतर ते हॉस्पिटल मध्ये गेले आणि त्यांचा मृत्यू झाल्याचे कळाले.  
पवार परिवार आणि हा परिवार दुःखात आहे. मी त्यांच्या कुटुंबाशी चर्चा करुन त्यांचे सांत्वन केल्याचे रोहित पवार म्हणाले.

पक्ष विलिनीकरणाबाबत अजित पवारांसोबत काय चर्चा झाली? या सगळ्या प्रक्रियेत मी होतो. तेरा दिवसांनी मी सर्व सांगेल, असे रोहित पवार म्हणाले. मी पत्रकार परिषद घेऊन त्या संदर्भात सांगेल. 13 दिवस ज्यादिवशी होतील, त्या दिवशी मी सांगेन. 
आता राजकीय बोलणे योग्य नाही, असे रोहित पवारांनी म्हटले.  

शपथविधीला पवार कुटुंब अनुपस्थित का?

सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होणार हे कोणाला माहीत नव्हते. लाखो लोक बारामतीमध्ये पवार कुटुंबाला भेटण्यासाठी येत होते. पार्थ देखील होता. संपूर्ण महाराष्ट्र येऊन भेटत नाही सत्वन करत नाही तोपर्यंत आपण बारामतीत थांबले पाहिजे. 
आम्हाला शपथविधीची बातमी देखील टीव्हीच्या माध्यमातून कळाली, असे रोहित पवार म्हणाले.  

रोहित पवारांची दादांसाठी भावनिक पोस्ट

”मा. अजितदादांनी जिथं विकासरुपी फुलांची बाग फुलवली तिथंच त्यांची राख सावडण्याची वेळ येईल, असं कधी स्वप्नातही आलं नाही.. पण नियतीच्या क्रूर खेळापुढं कुणाचं काही चालत नाही.. अजितदादांची ती दुर्दैवी बातमी आल्यापासून अद्यापपर्यंत डोकं सुन्न आहे… मन बर्फाप्रमाणे थिजलंय.. काय झालं, कसं झालं आणि का झालं, या विचाराचं मनातलं काहूर थांबत नाहीय… आपल्यात आत्तापर्यंत जे-जे काही संभाषण झालं, चर्चा झाल्या, विशेषतः शेवटच्या काही दिवसांमध्ये झालेल्या भावनिक चर्चा, हे सगळं काही एखादा टेपरेकॉर्डप्रमाणे सारखं सारखं कानात घुमतंय. जणू काही तुम्हीच अदृश्य स्वरुपात बोलत आहात असा भास होतोय. तुमची ती काम करण्याची शैली, प्रशासनावर पक्की मांड, राजकारणावर मजबूत कमांड, परखड स्वभाव, हो ला हो आणि नाही ला नाही न करता जे असेल ते स्पष्ट सांगून समोरच्या व्यक्तीसोबत राजकारण न खेळण्याची पद्धत, कामाचा झपाटा, वेळेचं काटेकोर नियोजन या सगळ्याचं आम्हाला अक्षरशः कौतुक आणि आश्चर्यही वाटायचं. सत्ता असो किंवा नसो, कायम तुमचा दरारा वाटायचा, आदरयुक्त भिती असायची. तुमचा सार्वजनिक वावर बघून तुम्हाला न भेटलेल्या अनेकांना तुम्ही फणसाप्रमाणे कठोर वाटायचात पण तीच व्यक्ती जेंव्हा तुमच्या संपर्कात यायची तेंव्हा फणासातील रसाळ आणि मधुर गऱ्याप्रमाणे तुमचा स्वभाव पाहून ती तुमच्या प्रेमात पडायची, याचे आम्ही साक्षीदार आहोत.’

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp