
तिवसा तालुक्यातील गुरुदेव नगर येथे संताजी जगनाडे महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी तेली समाज आग्रही झाला आहे. संत परंपरेचा वारसा जपण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी हा पुतळा उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी ग्रामपंचायतीला पत्र देण्यात आले असून, विविध कंपन्यांकडून सीएसआर निधी मिळवून देण्याची विनंती करण्यात आली आहे. गुरुदेव नगरचे उपसरपंच मिलिंद काळमेघ यांना याबाबत निवेदन सादर करण्यात आले. गावातील संत परंपरा, भक्तीभाव आणि सामाजिक एकात्मता जपण्यासाठी पुतळा उभारणे आवश्यक असल्याचे निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे. या उपक्रमातून भावी पिढीला संतांच्या विचारांची प्रेरणा मिळेल आणि सामाजिक मूल्यांची जपणूक होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. या पुतळा उभारणीसाठी अंदाजे ५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा खर्च सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) निधीतून भागविण्याची विनंती करण्यात आली आहे. याशिवाय, पुतळ्यासाठी योग्य सार्वजनिक जागा निश्चित करून आवश्यक प्रशासकीय मान्यता तातडीने देण्यात यावी, अशी मागणीही तेली समाजाने केली आहे. यावेळी नामदेव मुंगले, धनराज बारबुद्धे, जयंत निखाडे, सूरज देवतारे, योगेश भिल, विनोद मुंगले, मंगेश तांबूलकर, नितीन निखाडे यांच्यासह तेली समाजाचे अनेक प्रतिनिधी उपस्थित होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



