digital products downloads

तोतया पोलिसासह चेन स्नॅचर्सच्या टोळ्या गजाआड: 16 गुन्ह्यांचा उलगडा, साडेआठ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; ठाणे गुन्हे शाखेची कारवाई – Mumbai News

तोतया पोलिसासह चेन स्नॅचर्सच्या टोळ्या गजाआड:  16 गुन्ह्यांचा उलगडा, साडेआठ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; ठाणे गुन्हे शाखेची कारवाई – Mumbai News



ठाणे शहर पोलिस आयुक्तालय क्षेत्रात वाढत्या चेन स्नॅचिंग, मोबाईल चोरी आणि तोतया पोलिस बनून नागरिकांना लुटणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध गुन्हे शाखेने मोठी मोहीम राबवली आहे. गुन्हे शाखा घटक-२ (भिवंडी) ने अत्यंत शिताफीने दोन वेगवेगळ्या टोळ्यांच्या मुसक्या आवळून तब्बल १८ गुन्ह्यांचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एकूण १० लाख ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. भिवंडी-कल्याण बायपासवर रचला सापळा गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शीतल राऊत यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, कल्याण-भिवंडी बायपासवर सापळा रचून रवींद्र धनाजी भोसले (२४ वर्ष) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली. त्याने भिवंडी, कल्याण, ठाणे, उल्हासनगर, कर्जत, पुणे रेल्वे परिसरात एकूण १३ चेन स्नॅचिंग आणि ३ मोबाईल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. चोरलेला माल त्याने अंबिवली येथील दिनेश पांडुरंग पाटील (४७ वर्ष) याला विकल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली असून त्यांच्याकडून १५ तोळे ६ ग्रॅम सोन्याचे दागिने, २१ मोबाईल फोन असा एकूण ८ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तोतया पोलिसाला अटक ‘पोलिस बतावणी’ करून नागरिकांना लुबाडणाऱ्या एका सराईत गुन्हेगारालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मोहम्मद अजीज जाफरी (रा. लोणी काळभोर, पुणे) याला भिवंडीतून संशयास्पदरीत्या ताब्यात घेण्यात आले. त्याने भिवंडी शहरात तोतया पोलिस बनून २ गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याने चोरलेले सोने कर्नाटक मधील बीदर येथील एका इसमाला विकले होते. त्याच्याकडून ४५ ग्रॅम वजनाचे (२,२०,००० रु. किमतीचे) सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. हे ही वाचा… मी कार्यकर्त्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभी:अजितदादांचे स्वप्न पूर्ण करायचंय, सुनेत्रा पवारांचे पुण्याच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेले नैराश्य झटकण्यासाठी आणि त्यांना नवी उभारी देण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज पुण्यात पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या बैठकीत अजितदादांच्या आठवणीने सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर झाले. मात्र, अत्यंत भावूक वातावरणातही त्यांनी कार्यकर्त्यांना धीर देत, “अजितदादांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे, खचून जाऊ नका,” अशी साद घातली. सविस्तर वाचा…

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp