digital products downloads

तो गट नंबरच अस्तित्वात नाही, दानवेंवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार!: अंबादास दानवे यांचे मानसिक संतुलन बिघडले- संदीपान भुमरे – Chhatrapati Sambhajinagar News

तो गट नंबरच अस्तित्वात नाही, दानवेंवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार!:  अंबादास दानवे यांचे मानसिक संतुलन बिघडले- संदीपान भुमरे – Chhatrapati Sambhajinagar News



शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते अंबादास दानवे यांनी खासदार संदीपान भुमरे यांच्यावर केलेल्या 1150 कोटींच्या कथित जमीन घोटाळ्याच्या आरोपांना भुमरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ज्या गट नंबरचा उल्लेख दानवेंनी केला, तो गटच अस्तित्वात नाही, असे स्पष्ट करत भुमरे यांनी दानवे यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे म्हटले आहे. संदीपान भुमरे म्हणाले की, अंबादास दानवे यांनी ज्या जमिनीचा उल्लेख केला, तिथे केवळ 171 गट नंबर आहे. मग 174 नंबर आला कुठून? जेव्हा गट नंबरच अस्तित्वात नाही, तर तिथे हिबानामा (भेटपत्र) होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. दानवे यांनी ज्या 154 नंबरच्या गटाचा विषय काढला आहे, तो सध्या न्यायालयात असून त्यातील संबंधित व्यक्ती पूर्णपणे वेगळ्या आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. ड्रायव्हरचा जन्म झाला नव्हता तेव्हाचे प्रकरण आपल्या चालकाच्या नावावर जमीन असल्याच्या आरोपाचा समाचार घेताना भुमरे म्हणाले, माझ्या चालकाने कधीही जमीन घेतलेली नाही. ज्या प्रकरणाचा उल्लेख दानवे करत आहेत, तेव्हा माझ्या चालकाचा जन्मही झाला नव्हता. अधिकाऱ्यांनी लेखी उत्तर दिले असून पूर्वीचे सर्वे नंबर आता बदलले आहेत. दानवे केवळ प्रसिद्धीसाठी आणि संदीपान भुमरे दिसले की आरोप करण्यासाठी हे उद्योग करत आहेत.

मानसिक संतुलन ढासळल्याचा टोला अंबादास दानवे यांच्यावर टीकास्त्र सोडताना भुमरे पुढे म्हणाले की, विरोधी पक्षनेतेपदाचा लवाजमा आणि सत्तेची सवय असलेल्या दानवे यांची आमदारकी आता गेली आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे (उद्धव सेना) मोठे नुकसान झाले असून मनपा किंवा जिल्हा परिषदेतही त्यांचे कोणी निवडून येत नाहीये. हताश झाल्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असून ते निराधार आरोप करत आहेत. मी आतापर्यंत शांत होतो, पण आता सहन करणार नाही. अंबादास दानवे यांनी माझी बदनामी केल्याप्रकरणी मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे. येत्या दोन दिवसांत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाईल. हिबानामा हा 1971 मध्ये जावेद रसूल शेख यांच्या नावाने करण्यात आला आहे जर जन्मच1985 मधील असेल तर 1971 मध्ये तीन एकराचा हिबानामा कसा झाला त्यामुळे उगाचच खोटेनाटे आरोप करून प्रसिद्धी मिळवण्याचा दानवे यांचा हा धंदा आहे विरोधी पक्षनेते पद गेल्यानंतर आता त्यांना कोणीही विचार नसल्यामुळे जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या नेत्यांवर आरोप करायचं हा धंदा त्यांनी गेल्या काही दिवसापासून सुरू केला आहे. समृद्धी महामार्गातील 1,150 कोटी रुपयांच्या मूल्यांकनातील रक्कम मिळावी, यासाठी खासदार संदीपान भुमरे यांचे वाहनचालक जावेद रसूल शेख यांच्या नावे 1971 मध्ये तीन एकराचा हिवानामा (बक्षीस पत्र) करण्यात आला. वस्तुतः जावेद रसूल यांचा जन्म 1985 मधील असल्याने हा हिबानामा कसा झाला, यात कोणाचे हितसंबंध दडले आहेत, याची गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे व महसूल प्रशासनाकडे केली आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp