
Aditya Thackeray On Night Life: महाराष्ट्र सरकारने दुकाने, हॉटेल्स आणि व्यावसायिक संस्थांना 24 तास सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे. मद्य विक्रीशी निगडित ठिकाणे वगळता इतर व्यवसायांना ही सवलत मिळालीय. यामुळे राज्याची अर्थव्यवस्था गती घेईल. राज्य सरकारच्या या निर्णयावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधलाय. ‘मुंबई 24/7’ प्रस्तावावर आधी टीका करणाऱ्या भाजपने आता तेच धोरण अवलंबले, यावर त्यांनी उपहासात्मक प्रश्न उपस्थित केले आहेत.
महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 2017 अंतर्गत उद्योग विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार, मद्य पुरवठा करणाऱ्या बार, परमिट रूम, हुक्का पार्लर आणि देशी दारूच्या दुकानांवर वेळेचे बंधन कायम राहील. उर्वरित दुकाने, रेस्टॉरंट्स आणि खाद्यगृहे आता आठवड्यातील सर्व दिवस रात्रंदिवस चालवता येतील. यामुळे मुंबईसारख्या कधीच न झोपणाऱ्या शहराला अधिक चालना मिळेल.
कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण
24 तास व्यवसायाला परवानगी असली तरी अधिनियमाच्या कलम 16 (1)(ख) नुसार, कर्मचाऱ्यांना दर आठवड्याला सलग २४ तासांची सुट्टी देणे सक्तीचे आहे. यामुळे कामगारांच्या आरोग्य आणि सेवाशर्तींचे रक्षण होईल. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांच्या अनावश्यक हस्तक्षेपावरही आळा बसेल, ज्यामुळे व्यापाऱ्यांना दिलासा मिळेल.
तक्रारींची दखल
व्यापाऱ्यांकडून यापूर्वी पोलिस आणि स्थानिक अधिकाऱ्यांमुळे रात्रीच्या व्यवसायाला अडथळे येण्याच्या तक्रारी होत्या. लोकप्रतिनिधींनीही याबाबत आवाज उठवला होता. या समस्यांची गांभीर्याने दखल घेऊन शासनाने कठोर अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. परिणामी, ‘नाईट इकॉनॉमी’ला प्रोत्साहन मिळेल आणि रोजगाराच्या संधी वाढणार आहेत.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
हे मजेशीर आहे, ज्या भाजपने माझ्या ‘मुंबई 24/7’ धोरणावर संस्कृती आणि सुरक्षिततेच्या कारणावरून पातळी सोडून टीका केली होती, त्याच भाजपने आता त्याच धोरणाचा अध्यादेश पुन्हा काढल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. त्यावेळी मी त्यांना विचारलं होतं आणि आजही पुन्हा तेच विचारतोय, कष्टकरी मुंबईकरांना रात्री उशिरापर्यंत जेवणाखाणाची, थोडा निवांत आनंद घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात नक्की काय अडचण आहे? असा प्रश्न त्यांनी विचारला. मुंबई कष्टकऱ्यांचं शहर आहे आणि हे शहर 24/7 धावतच राहतं. जानेवारी २०२० पासूनच हे धोरण अस्तित्वात आहे आणि तेव्हा भाजप नेत्यांनी ह्यावर आक्षेप घेतला होता.नवा अध्यादेश काढण्याची काही गरजच नव्हती. पण भाजपला आता आपलं मत बदलण्यास नेमकं काय कारणीभूत ठरलं? असा प्रश्नही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.
हे मजेशीर आहे, ज्या भाजपने माझ्या ‘मुंबई 24/7’ धोरणावर संस्कृती आणि सुरक्षिततेच्या कारणावरून पातळी सोडून टीका केली होती, त्याच भाजपने आता त्याच धोरणाचा अध्यादेश पुन्हा काढला आहे.
त्यावेळी मी त्यांना विचारलं होतं आणि आजही पुन्हा तेच विचारतोय, कष्टकरी मुंबईकरांना रात्री…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 3, 2025
या निर्णयामुळे महाराष्ट्राची व्यावसायिक संस्कृती अधिक गतिमान होईल. मात्र, राजकीय नेत्यांच्या टोमण्यांमुळे चर्चेला उधाण आले आहे. व्यापारी आणि नागरिकांसाठी ही पावले दिलासादायक असली तरी अंमलबजावणी कशी होते? याकडे लक्ष लागून राहिले आहे.
FAQ
प्रश्न: महाराष्ट्र सरकारच्या नव्या धोरणानुसार कोणत्या आस्थापना 24 तास सुरू ठेवता येतील?
उत्तर: महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 2017 अंतर्गत, मद्य विक्री करणारे बार, परमिट रूम, हुक्का पार्लर आणि देशी दारूची दुकाने वगळता इतर सर्व आस्थापना, जसे की रेस्टॉरंट्स, खाद्यगृहे, दुकाने आणि व्यापारी संकुले, आठवड्याचे सर्व दिवस 24 तास सुरू ठेवता येतील. यासाठी कर्मचाऱ्यांना साप्ताहिक 24 तास सुट्टी देणे बंधनकारक आहे.
प्रश्न: आदित्य ठाकरे यांनी भाजपला कोणता खोचक सवाल विचारला आहे?
उत्तर: आदित्य ठाकरे यांनी भाजपवर टीका करताना म्हटले की, त्यांच्या ‘मुंबई 24/7’ धोरणावर भाजपने 2020 मध्ये संस्कृती आणि सुरक्षेच्या नावाखाली पातळी सोडून हल्ला केला होता. आता त्याच धोरणाचा अध्यादेश पुन्हा काढण्यामागे काय कारण आहे? कष्टकरी मुंबईकरांना रात्री उशिरापर्यंत जेवण आणि निवांत वेळ घालवण्याची सुविधा देण्यात काय हरकत आहे, असा सवाल त्यांनी विचारला.
प्रश्न: या धोरणामुळे कोणत्या समस्यांचे निराकरण होईल?
उत्तर: या धोरणामुळे स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून 24 तास व्यवसाय चालवणाऱ्या आस्थापनांना होणारे अडथळे कमी होतील. व्यापाऱ्यांकडून आलेल्या तक्रारी आणि लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची दखल घेऊन सरकारने हे पाऊल उचलले आहे. यामुळे मुंबईच्या ‘नाईट इकॉनॉमी’ला चालना मिळेल आणि रोजगाराच्या संधी वाढतील.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.