
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यावरुन नव्या वादाला तोंड फुटलं आहे. गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटील यांच्या आई-वडिलांवर टीका केली आहे. यावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. एवढंच नव्हे तर जितेंद्र आव्हाडांनी पडळकरांचा थेट सांगलीत जाऊन समाचार घेतला आहे.
माणुसकी उरली की नाही…
राजकारण चुलीत गेलं, माणूसकी उरली की नाही असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केली आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले की,आई बद्दल बोलणे ही ठरलेली नीती आहे, जेम्स लेणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई बद्दल लिहले होते. त्यावेळी महाराष्ट्र पेटला, तशीच वेळ मला आज वाटत आहे, असं यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले एवढंच नव्हे तर हा कसला सुसंस्कृतपणा असा सवालही केला आहे. वाटोळे करून टाकले आहे,महाराष्ट्रचे.. यांच्या गँगमधील माणस शरद पवारांच्या घरात मानस घुसवली होती, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
मंगळसूत्र चोर का ओरडला हे मला कळलं
मी विधानसभेत जाताना हा माझ्या बद्दल बोलला ,पण मी जयंत पाटील नाही, जितेंद्र आव्हाड आहे, मग मी मंगळसूत्र चोर ओरडलो, असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी आपला जुना वाद आणि तो विषय सांगितलं. मी कोणाचे नाव घेतले नव्हते, मग एवढा राग कश्याला आला, असा सवालही जितेंद्र आव्हाडांनी केला आहे. पडळकर वाडीच्या त्या आजीच्या 18 एकर जागेबाबत उत्तर द्यावे..काय झाले त्या जागेचा ,18 एकर जागा परत दिली का ?असा सवालही जितेंद्र आव्हाडांनी केला.
गोपीचंद यांनी जयंत पाटलांवर काय टीका केली?
जयंत पाटला तुझ्या सारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्यात कार्यक्रम करायची ती धमक आहे. तुझ्यासारखी ती अवलाद नाही. जयंत पाटील हा बिनडोक माणूस असून त्याला काही अक्कल नाही. जयंत पाटील हे स्वर्गीय राजारामबापू पाटील यांची औलाद आहेत, असे वाटत नाही अशा खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती.
FAQ
जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर वाद काय आहे?
हा महाराष्ट्रातील राजकीय वाद आहे, जो १८ सप्टेंबर २०२५ रोजी सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघातील एका सभेत सुरू झाला. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर आक्षेपार्ह आणि अपमानास्पद टिप्पणी केली. पडळकर म्हणाले, “तू राजारामबापू पाटील यांची औलाद वाटत नाहीस, काही तरी गडबड आहे.” यामुळे जयंत पाटील यांच्या वडिलांच्या (कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सहकार क्षेत्रातील पायोनियर राजाराम पाटील) स्मृतीचा अपमान झाल्याचा आरोप होत आहे. हा वाद निवडणुकीपूर्वीचा राजकीय संघर्ष असून, राज्यभरात आंदोलने होत आहेत.
गोपीचंद पडळकर यांची पार्श्वभूमी काय आहे?
गोपीचंद पडळकर हे भाजपचे आमदार आहेत, जे सांगली जिल्ह्यातील जत मतदारसंघातून २०१९ मध्ये निवडून आले. ते आक्रमक आणि वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात. यापूर्वी त्यांनी शरद पवार, अजित पवार, संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर अपमानास्पद टीका केली आहे. 2021 मध्ये त्यांनी जयंत पाटील आणि पवार कुटुंबावर हत्येचा कट रचल्याचा आरोप केला होता. पडळकर हे मराठा आरक्षण आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर बोलतात, पण त्यांच्या भाषणांमुळे सतत वाद होतात. ते म्हणतात, “मी माफी मागणार नाही,” आणि स्वतःला “आक्रमक नेते” म्हणवतात.
हा वाद कसा सुरू झाला?
हा वाद जत पंचायत समितीतील एका ज्युनियर इंजिनीअरच्या आत्महत्येपासून सुरू झाला. इंजिनीअरची कुटुंबीयांनी पडळकर आणि त्यांच्या वैयक्तिक सहाय्यकावर दबाव टाकल्याचा आरोप केला. यावर जयंत पाटील यांनी पडळकरांवर टीका केली. प्रत्युत्तरात पडळकरांनी सभेत जयंत पाटील यांना “बिनडोक माणूस” आणि “फालतू” म्हणून हल्ला चढवला, आणि वडिलांचा उल्लेख करून अपमान केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.