
NCP Weekly Meet Sunetra Ajit Pawar Emotional Appeal: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची पहिलीच साप्ताहिक बैठक सोमवारी, 16 फेब्रुवारी रोजी मुंबईत पार पडली. या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी नेतृत्व केलं. बैठकीला पक्षाचे सर्व खासदार, आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान सुनेत्रा पवार बोलायला उभ्या राहिल्या तेव्हा त्यांना अजित पवारांच्या आठवणींनी गहिवरुन आलं. मात्र धीर सावरत त्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना एक भावनिक आवाहन केलं आणि त्या आवाहनला उपस्थितांनी तितक्याच उस्फुर्तपणे साद दिली.
हीच राष्ट्रवादीची ओळख राहील; सुनेत्रा पवारांनी केलं स्पष्ट
राष्ट्रवादीच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर बैठकीतील फोटो शेअर करण्यात आले आहेत. “आज (सोमवारी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साप्ताहिक बैठक राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी पक्षाचे वरिष्ठ नेते, आमदार, खासदार व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्या शिस्तीने, कार्यतत्परतेने आणि विकासाच्या स्पष्ट दृष्टीकोनातून पक्षाची वाटचाल घडवली, ती कार्यसंस्कृती अधिक बळकट करण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी व्यक्त केला,” अशी कॅप्शन या फोटोंना देण्यात आली आहे. याच पोस्टमध्ये सुनेत्रा पवारांनी नेमकं काय म्हटलं याबद्दल, “अजितदादांची कामाची गती, प्रशासनावरील भक्कम पकड आणि विकासकेंद्रित भूमिका हीच राष्ट्रवादीची ओळख राहील, असे सुनेत्रावहिनींनी मार्गदर्शनपर सूचित केले,” असं नमूद केलं आहे.
नक्की वाचा >> ‘कोणीही दोन्ही राष्ट्रवादींच्या…’, सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखालील बैठकीत विलीनीकरणासंदर्भात महत्त्वाचा निर्णय
बैठकीची सामूहिक प्रतिज्ञा
“सदर बैठकीत आगामी काळातील संघटनात्मक बळकटी, युवकांना अधिक संधी, महिलांच्या नेतृत्वाचा विस्तार आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस कृती आराखडा यावर सखोल चर्चा झाली. वेगवान, सक्षम आणि प्रगत महाराष्ट्र घडवण्याचे दादांचे स्वप्न साकार करण्यासाठी पक्ष अधिक संघटित, अधिक शिस्तबद्ध आणि अधिक उत्तरदायी राहील, हीच आजच्या बैठकीची सामूहिक प्रतिज्ञा ठरली. लोकहित आणि विकासाचा प्रवास अखंड सुरू ठेवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला,” असं पक्षाने दिलेल्या माहितीत म्हटलं आहे.
सुनेत्रा पवारांचं भावूक आवाहन आणि समोरुन तितकेच भावूक उत्तर
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांची आणि मंत्र्यांची पहिल्याच बैठकीत उपस्थित नेत्यांना संबोधित करताना सुरुतीलाच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भावूक झाल्या. बैठकीत सुनेत्रा पवार यानी नेत्यांना भावनिक आवाहन केलं. “अजितदादांच्या पावलावर पाऊल ठेऊन मी आता पुढे काम करणार आहे. त्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे,” असं सुनेत्रा पवार म्हणाल्या. त्यावर “सुनेत्रावहिनी तुम्ही विनंती करू नका फक्त आदेश द्या, तुमच्या आदेशाचे पालन आम्ही करणार,” असं म्हणत नेत्यांनी सुनेत्रा पवारांच्या भावनिक आवाहनाला प्रतिसाद दिला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



